Wednesday, June 21, 2017

नोटांची माहिती

रिझर्व बँकेची पहिली नोट

        सोमवार १ एप्रिल १९३५ मध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली. त्यावेळेस बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे होते. जोपर्यंत स्वतःच्या नोटांची निर्मिती होत नव्हती तोपर्यंत आर बी आय ऍक्ट ,१९३४ सेक्शन २२ प्रमाणे ब्रिटिश मालिकातील नोटाच भारत सरकारच्या नोटा म्हणून चलनात होत्या. बँकेने आपली स्वतःची पहिली ५ रु ची नोट १९३८ मध्ये 'जॉर्ज VI ' च्या पोट्रेटची काढली. ह्या रिझर्व बँकेने काढलेल्या पहिल्या नोटेवर दुसरे गव्हर्नर सर जेम्स टेलर ह्यांची सही होती. १९४० मध्ये १ रुपयांच्या नोटेची पुनर्निर्मिती करण्यात आली. त्यावेळी युद्ध काळात या नोटेची किंमत १ रुपयाच्या नाण्याइतकी होती.

नोटांची सुरक्षा

       बँक ऑफ बंगाल ने नोटांचे चलन सुरु करताना ज्या तीन मालिकांमध्ये नोटा प्रस्तुत केल्या त्यापैकी तिसरी मालिका म्हणजे ब्रिटानिया. यात नोटेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही फेरबदल करण्यात आले होते. १८६१ मध्ये 'पेपर करन्सी ऍक्ट' ब्रिटिशांनी लागू केला. तेव्हापासून भारतातील चलनाचे सर्वाधिकार त्यांनी ताब्यात घेतले. अकाउंटंट जनरल आणि कंट्रोलर ऑफ करन्सी या अधिकाऱ्यांची त्यासाठी नेमणूक करण्यात आली. ब्रिटिशानीही बँक ऑफ बंगाल प्रमाणे या नोटा मालिकांमध्ये प्रस्तुत केल्या. पहिली मालिका 'व्हिक्टोरिया पोर्ट्रेट ' या नावाने काढण्यात आली. यात १०, २०,५०,१०० आणि १००० च्या नोटांचा समावेश होता. त्यावर दोन भाषांच्या लिपिंचा समावेश होता. सुरक्षेसाठी या नोटांवर 'वॉटर मार्क' , अधिकाऱ्याची सही, आणि नोटेचा रजिस्ट्रेशन नंबर या गोष्टींचा समावेश करण्यात येत असे.

टंकलेखन:-प्रियांका कुंटे
संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Monday, June 19, 2017

संतवाणी - ते ते केशवी तारिले!!

नामस्मरण हे तारक सर्वार्थाने 'साहाकारी' साह्यकारक असते. म्हणून 'हरिहर ब्रह्मादिक ही'त्याचे अनुसरण करतात. नामबळामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला. म्हणतात...

*नाम घेता भगवंताचे|पाश तुटती भवाचे||*
*जे जे नामीं रत जाले|ते ते केशवीं तारिले||*

भगवंतांचे नियमित स्मरण ठेवले,तरच भवबंधने बाधक ठरत नाहीत. ज्या ज्या भक्त- साधकांनी नामसाधनेचा मार्ग स्वीकारला त्या सर्वांचा उद्धार भगवंताने केला,असा आपला इतिहास आहे.

*गणिका दुराचारी|*
*नामें तारिली अहिल्या नारी||*
*महा पापी आजामेळ|*
*तोही तारिला चांडाळ||*

गणिका वेश्या. ती दुराचारात रमलेली होती.तिने नाम घेतले.तिचा उद्धार झाला. आपल्या कोपिष्ट पतीच्या शापाने अहिल्या शिळा झाली होती. देवरायाच्या मात्र स्पर्शाने तिला पूर्वीचे रूप प्राप्त झाले. चांडाळ आजामिळ हा महापापी. त्यालाही ईश्वरनाम घेण्यामुळे सद् गती मिळाली.

*नामे गजेंद्र तारिला|देवें मोक्षपदासीं नेला||*
*नाम घेतसे पांचाली| उभा बाप वनमाळी||*

अशी गजेंद्रमोक्षाची पुराण-प्रसिद्ध कथा आहे. त्याला मगरीने धरले त्यावेळी त्याने देवाचे स्मरण केले. ईश्वराने त्याला मुक्ती दिली. पांडवांची पांचाली हिची विटंबना कौरवांनी केली तेव्हा तिने वनमाळी-कृष्णाची करुणा भाकली. त्याने तिला तारले. तिचे अब्रूरक्षण केले.

*नामा सांगे भविकांसी|*
*नाम घ्या रे अहर्निशी||*

म्हणून सर्व भाविकांना विनंती करतात,तुम्ही अहर्निशी...सातत्याने भगवंताचा जप करावा.

*डॉ.अशोक कामत*
*संकलन*- *सौ.मंजिरी होनकळसे*
*टंकन- *#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*

वेम्ब्ले स्टेडीयम

वेम्ब्ले स्टेडीयम हे लंडन मधील वेम्ब्ले पार्क येथे आहे. मुख्यतः फुटबॉल खेळासाठी या मैदानाचा वापर केला जातो. या स्टेडीयम वरील पांढरी कमान ही शहराच्या बाहेरून सुद्धा दिसते. हि कमान सर्व युरोपात प्रसिद्ध अशी कमान आहे. द फुटबॉल असोसिएशन यांचा मालकीचे हे स्टेडीयम असले तरी वेम्ब्ले national स्टेडीयम लि. यांच्या मार्फत या स्टेडीयम चे सर्व व्यवहार पाहिले जातात. इंग्लंड नॅशनल फुटबॉल टीम यांचे हे होम ग्राउंड आहे. फुटबॉलच्या सामन्यांप्रमाणेच या मैदानावर इतर खेळांचेही सामने आणि मोठे संगीत महोत्सव होतात. ‘लंडन ड्रीम्स’ या बॉलीवूडच्या चित्रपटाचे हे मुख्य चित्रीकरणाचे केंद्र होते.

२०११ यु इ एफ ए चॅम्पियन लीग फायनलच्या सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात येणार आहे. वेम्ब्ले स्टेडीयम हे पूर्वी ब्रिटीश एम्पायर एक्झीब्युशन स्टेडीयम या नावाने ओळखले जात असे. जगातील अनेक मोठ्या फुटबॉल च्या स्टेडीयम पैकी हे एक महत्वाचे मोठे स्टेडीयम आहे. इग्लंडचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडीयम असल्यामुळे तसेच भौगोलिक दृष्ट्या खेळांसाठी स्वाभाविक मैदान असल्यामुळे ते फुटबॉलचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते. या मैदानावर युरोपियन कप म्हणजे यु इ एफ ए चॅम्पियन्स लीग स्पर्धा घेतल्या जातात. ज्या सतरा स्टेडीयम वर एस आय एफ ए वर्ल्ड कप च्या मॅचेस घेतल्या जातात त्यापैकी हे एक मैदान आहे. २००० साली हे बंद करण्यात आले. २००३ पर्यंत हे आहे त्याच अवस्थेत होतं परंतु नंतर स्टेडीयमचे नवीन बांधकाम सुरु झाले. २००६ मध्ये ते पूर्ण व्हायला हवे होते परंतु हे संपूर्ण बांधकाम ९ मार्च २००७ ला पूर्ण झाल्यावर ते हस्तांतरित करण्यात आले. युरोप मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान असून त्याची आसन क्षमता ९०००० आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही त्याचा नाव लौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वात महाग बांधकाम असलेले स्टेडीयम आहे. ८०० दशलक्ष पौंडस इतका खर्च या बांधकामाला आला आहे. हे मैदान १८८० पासून म्हणजे बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्किटेक्ट फोस्टर प्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनियर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. गृफ फिल्ड्स मल्टीप्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड स्पोर्ट्स आणि लंडन डेव्हलपमेंट एजन्सी यांचा हे स्टेडीयम पूर्ण करण्यात सहभाग होता. या स्टेडीयमचा आकार हा बाउल प्रमाणे असून याचे वरचे छत सरकते आहे. काहीवेळा अथ्लेटीक्ससाठी सुद्धा या मैदानाचा उपयोग केला जातो. हे स्टेडीयम वेम्ब्ले पार्क स्टेशन पर्यंत भूमिगत रेल्वेने जोडले गेले आहे. या मैदानाचे बांधकाम सुरु असतांना ३५०० कामगार त्यावर काम करत होत्रे. ५६ किमी लांबीची हेव्ही ड्युटी विजेची केबल आणण्यात आली असून २६१८ प्रसाधन गृहे येथे बांधण्यात आली आहेत.

*टंकलेखन:-वैभव तुपे*
*संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*

दोनशे वर्षापूर्वीचा अस्सल मराटी खाना

*रुचकर-- संजीवनी खेर*
"शरभेंद्र पाकशास्र" या तंजावर राज घराण्यातील मुदपाकखान्यातील पदार्थांच्या कृतीच्या ग्रंथातील काही वेगळ्या पाककृती येथे देत आहोत.
➖➖➖➖➖➖➖➖➖

तीन शतके मराठी राज घराणे तंजावर येथे सत्तेवर होते. सरफोजी राजांच्या ग्रंथालयात असलेल्या हस्तलिखितावरुन हा ग्रंथ मराठी, तामीळ व इंग्रजी भाषेत सिद्ध झाला आहे. सरफोजी राजे (२ रे) हे स्वतः उत्तम रसज्ञ होते. त्यांच्या मुदपाकखान्यात तीन स्वयंपाकघरे होती. एकात शुद्ध शाकाहारी पदार्थ, तर दुस-यात मांसाहारी (मराठी पद्धतीचे) व तिसऱ्यात युरोपियन पद्धतीचे पदार्थ रांधले जात असत. मोडी हस्तलिखितावरुन हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या धर्तीचे हे राजपाकखान्यातील पदार्थ अस्सल तामीळ मातीतील मसाले वापरून तेथील पद्धतीचे अनुसरण करीतच बनविले जात. तामीळनाडूतील मराठी माणसे महाराष्ट्रातील पदार्थ करीत पण कालांतराने त्यांनी तेथीलच भोजनशैली अनुसरली. पदार्थांची नावे मराठी वाटली तरी हे पदार्थ महाराष्ट्रात होत असतीलच असे नाही इतके ते रं, रुप, चव यामध्ये तामीळी आहेत.

सरफोजी महाराजांच्या तीन स्वयंपाकघरांसह त्यांचा शरबतखाना, ओब्दारखाना, थाटीमहलखाना प्रसिद्ध होते. कोट्टीयम-- कोठीघर--कडे विशेष सोई अन्नधान्याच्या सुरक्षिततेसाठी व शुद्धतेसाठी केलेल्या असत.

वेगवेगळ्या प्रकारचीट सुपं इथे तयार होत. रस्सा, मटन, आमटी, रस्लुम गोळा, तळलेले गोळे असे विविध पदार्थ इथं होत. सर्वात वेगळा प्रकार आहे खजाच्य--कापट्यांचा! षड्रसांचा नीट परिपोष व्हावा याचा विचार मुदपाकखान्यात कैलाट जाई. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट चवींचा परिपोष केला जाई. भोजनातील रससंतुलन महत्त्वाचे मानले जाई. शाही भोजनगृहातील पदार्थ चाखणा-यांची नियुक्ती राजांच्या सुरक्षेबरोबर पदार्थांची चव व संतुलन पाहणे यासाठी देखिल असे. हलवाई, शरबत बनविणारे व इतर फराळ बनविणारे यांची वेगवेगळी खाती वेगवेगळ्या महालात असत. राजघराण्यातील उत्सव, लग्न वा इतर समारंभ यांच्यासाठी खास भोजनव्यवस्था करणारे खाते होते. या ग्रंथातील भोजन पदार्थ महालातील वेगवेगळ्या आचा-यांना विचारुन लिहून ठेवलेले होते. त्यावेळची भाषा, वजनं, मापं मुद्दाम तसेच ठेवले आहेत.

*▪उडिदाचा भात :*
येक पडी ( २०० तोला) तांदुळाचा भात करुन घेणे. येक तामणांत घालून मद्धि उकरुन घेऊन त्या अन्नावरी घालणेचे जिन्नस :-- उडिदाची ढाळ ५ शेर भाजून पूड करुन घालणे. मीठ ९ तोला, मिरे तुपात तळुन १ तोला, ठेंचुन घालणे.येणे प्रमाणे तीनी जिनस घालून काळवून फोडणी देण्याचे बयाज:-- तूप १/२ शेर, मिरशेंगा सुमार ५, उडिदाची ढाळ २ तोला, मोह-या ४--१/२ तोला, हिंग पाव तोला, करेपाक २ तोला, येणे प्रमाणे सात जिनस घालून उडिदाची दाळ लाल होतांच त्या अन्नावरी फोडणी मिळवून आणि येक कित्ता काळवून देणे.

*▪तिलाची भात :*
२०० तोला तांदूलाचे अन्न कराळयाच्या पद्धतीने करुन घेणे. आणि कलाईच्या तामणात घालून उकरुन त्या अन्नात मिळविणेचा जिन्नस :-- तीळ सफेद १० तोळा, भाजून पूड करून घालणे, मीठ ९ तोला, येने प्रमाणे दोनि जिनस घालून अन्न कालवून घेणे. मग फोडणी देणेचा बयाज :-- तूप अर्ध शेर, उडिदाची दाळ २ तोला, मोहर्या ४--१/२ तोला, करेपाक २ तोला, मिरशेंगा सुमारे ४, येणे प्रमाणे साहा जिनस घालून उडिदाची दाळ लाल होताच त्या अन्नावरी फोडणी मिळवून देणे.

*▪चिंचभात :*
अन्न कराच्या पद्धतीने २०० तोला तांदुलाचे भात करून घेणे. कलईच्या तामणात घालुन उकरून घेणे. अन्नावरी घालणेचे जिनस :-- चिंच पावशेर, पाणीत काळवून पावशेर, ते चिंचाचं पाणी अन्नावरी घालून, मीठ १३ तोलाहीं आणि मोह-या ४--१/२ तोला, हे तळून वाटून घालणे. तिलाची पूडे ४--१/२ तोला, हळदीची पूड १ तोला, हरभर्याची ढाळ ४० तोला. हे ढाळ चांगला भिजत घालून मग नीट भाजून चखोट तेलात तळून घालणे.
सून्डकाईचे काचया ५ तोला चकोट तेलात कडक तळून (काळरंग होतोर) त्यात घालणे. येणे प्रमाणे हे अठजिनस त्या अन्नात मिळवून नीट काळवून देऊन फोडणी देण्याचा बयाज :-- चखोट तेल १ शेर, मिरशेंगा सुमार १०, उडिदाची ढाळ २ तोला, मोहर्या ४--१/२ तोला, करेपाक २ तोला, हिंग पाव तोला येणे प्रमाणे हे साहा जिनस घालून उडिदांची डाळे लाल होताच त्या अन्नावरी फोडणी मिळवून आणिक एक कित्ता काळवून देणे.

*▪यखनी पुलाव :*
उत्तम तांदूल २ पौंड, कोंबडीचे मांस आट पौंड, लोणकडं तूप १ रुपय भार, बिलायची पाव तोला, मीट १--१/२ तोला भार, दीड तोला विलायची, २ कागदी लिंब, मलाई अर्ध पौंड, मीट ७--१/२ तोला, एक लाडन बकरे, ससून (सोलीव) ९ तोला, २ रुपया भार सोलिव लसून, लोणकडे तूप १ तोला, लवंग १ तोला, अर्ध पौंड सोलिव बदामगीर, दूध १ पौंड, अर्ध तोला दालचिनी, कणीक अर्ध पौंड.

दोन शेर सडीक उत्तम तांदूल, स्वच्छ पाण्यात ४ दा दुवून त्यात पाणि घालून चार तास पावेतो टेवेन, मांसाचे पाव पौंड प्रमाण तुकडे करुन, वसेच कांबड्याच्या ४ पौंड मासडी तुकडे करुन दोन मांसही यकन्न करुन आट वेळ थुवावे माग त्यात २० पौंड पाणि आणि ९ तोला सोलिव लसून घालून, ते भांड जुतिवर ठेवून खालि जाल घालावा. कढयेत फेस येईल ते फेस दोन तीन वेळे काहडून टाकावे. दुसरे पात्र ठेवुन त्यात एक लोसा तूप घालून तूप तापताच १ तोला भार सोलिव लसून आणि पाव तोला वेळा टाकून फोडणी होताच त्यात वरील मांस पाण्यात ओतावे. खाली जाल मांस सिजोतागांईत शिजवून रस्सा सुमार ३ पौंड (४० तोला येक पौंड) राहिला तर रुमळाद घालून घेने. त्यास १ रुपयाभार तूप आणि पाव तोला वेळा, ह्यांची फोडणी करून रुमालातील बाक-याचे मांस काडून त्यामासास २० तोला दही आणि दीड तोला मीठ एकत्र करुन चोपडावे.

चुलिवर एक पातेले ठेवून त्यात तूप ८० तोलाभर घालून, तूप तापताच त्यांत १--१/२ तोला वेळा व १ मासा ( ३ गुंजभार) लवंगा टाकून फोडणी होताच सदरील मासाचे तुकडे घालावे. ते कल्ययान परवून त्यांतील पाण्याचा अंस हिसा होवून तूप विचरुन लागले ह्मणजे ते सर्व काढून ठेवावे.

*▪साधि बिरंजी :*
संबाव तांदूल १ पडी (२०० तोला), धुवुन भिजत ठेवून नंतर एक रुमालात घालून ठेवणे, साखर बिरंजी प्रमाणेच पाण्याचे वजन व वास बांधून घेण्याची पद्धती, साखर बिरांजिचे जिनसच. बक-याची तांबामास ३ शेर, थोर अवळ्या येवडे तुकडी करुन येक पात्रांत घावून धुवून तूया बराबरी घालून सिजवणेच्या सामानास बयाज :-- धणे ३ तोला, मिरशेंगा १ तोला, लसून १ तोला, कांदे ९ तोला, वाक्क खोबरे ९ तोला, हे सहा जिनसही बारीक वाटून मासांत घालून मीट १--१/२ तोला, धही १/२ शेर, अल्याचे रस ९ तोला त्यात सोडून वासांच्या तूपापैकी १ शेर घालून, पाणी ४ शेरही घालून सिजवता पाणी अटतोच दोनि चकोट लिंबाचा रस घालून उतरुन घेणे. फोडणीस प्रत्येक देकची ठेवून, बाकी तूप १ शेर घालून चिरले कांदे ९ तोला घालून कांदे लाल होताच लवंगा १/४ होन्नभार त्यात घालून मुस्तैद केळेते चौकातील तांदूळ घालून झारणीने दोनदा फिरवून वास बांधिल्या पाण्यापैकी ४ शेर पाणी घालिताच, बारीक वाटीले हळद २ तोला, मीठ १--१/२ तोला घालून झारणीने फिरवून देणे, येक कट येताच दूध २ शेर घालून पुनः झारणीने फिरवून देवून जाळ बारीक करुन दुसरे कढ येताच पक्व पाहून अन्नपूर्ण पक्व होताच उतरुन आहारावरी ठेवून तांबामास तुपासहित त्या अन्नात घालून झारणीने फिरवून वेळ्याचि बुकणी २/३ तोला त्यात घालून जायफळाची बुकणी १/६ तोला, त्यात घालून गुळाबाचे पाणी पाव शेरही शिपडून झारणीने च्यारी बाजून फिरवून देणे आणि डेकचीचे तोंडावरी शिपेढ चौकही त्यावर झाकून त्याहीवरी सिनही झांकून अहारावरी येक वाफा येतोर ठेवूव पक्व नीट पाहून अन्न पातळ अलल्या दुसरी वाफा येतोर ठेवून उतरुन घेणे.

*▪फणसाचि ज्जिं चे ( कोवळे कच्च फणास) कूट :--*
पिज्जी (पिदु) फणस ३ शेर वारील सालपट काहडून बारीक चिरुन घेऊन पाणी ५ शेर घालून मीठ ४--१/२ तोला, हळद १ तोला वाठून घालून नीट सिजवून वेळून घेणे. वेघळे पात्र ठेवून तूप ९ तोला घालून त्यात (वीसंपडी) १२--१/२ तोला मुगाचि दाळ घालून नीट लाल रंगाने भाजून पाणी २ शेर घालून नीट सिजवून, ते ठाळ काहडून त्यात घालणे. यात घालावयाचा मसाला :-- मिरशेंगा १--१/२ तोला, मिरे १ तोला, धणे १ तोला, वाल्ल खोबरे १ तोला, हे इत्यादी तूपात भाजून बारीक वाटून अर्धा शेर पाण्यात काळवून घालणे. नीट कढताच ते मसाल्याचे पाणी अटताच काढून घेणे. वेघळे पात्र फोडणीस ठेवून त्यात घालाळयाचे जिनस :-- तूप १/४ शेर, चिरले कांदे २ तोला, उडिदाची दाळ १ तोला, करेपा काचि ढाळी १, हे इत्यादी घालून कांदे उडिदाची दाळ लाल होताच त्यात भाजी घालून येक खोब-याची वाटी खिसून घालणे. कोथिंबीर २ तोला, हुरीट ३ तोलाही घालून मिळवून काडहून घेणे.

*▪रक्तिचे कापप्या :*

येक वीत रुंद तोंडाची पात्रांत येक बक-याचे रक्त धरुन पाव घडि ठेवून ते रक्त घट्ट होताच प्रत्येक पात्रांचे बुडांत वाल्ल गवन व पाचशेर पाणिही घालून चारि कढ येताच खाली उतरुन घेऊन कापप्या चिरुन घेण्याचे जिनसाने कापून दोनि आर्वती धुवून त्यास लावावयाचा मसाला :-- मिरशेंगा १ तोला, धणे ४ तोला, कांदे ४ तोला ( चिरुन ), हळद १ तोला, हे जिनस तूपात भाजून लाल रंगाणे होताच बारीक वांटून त्या फोडिस लावून त्या बराबरी घालणेस जिनस :-- ९ तोला कांदे चक्ती बारीक चिरून, सोलिव लसून बारीक चिरुन ९ तोला घालून, मीठ ३ तोला, चिंच १/२ शेर पाण्यात कोळून ९ तोला, चिरले कोथंबीर पाव शेर, येक नारळाचि वारि किसून मिळवणे. वरिल सांगितले प्रमाण इत्यादीही घालून २ शेर पिरूहीं ओतून ठेवणे फोडणीस पत्र ठेवून घालणेचे जिनस :- तूप पाव शेर, चिरले कांडे ४.१/२ शेर, जिरे पाव शेर, करेपाकाच्या ढाळ्या २, कांदे लाल होवून शब्द राहतांच फोडि व पाणी देखिल घालून पाणि अटतांच, भाजून बुकणी करून घालणेचे जिनस :- खसखस ४.१/३ तोला, वेळा पाव तोला, हे इत्यादीच्या बुकणीही घालून चाटूने चारिबाजू फिरवून देवून खाले उसरून ठेवून घेणे.

*▪कबाब खताई :*

मांस ८० तोला, १२.१/२ तोला अले, धणे २ तोला, १ तोला वेळा, केशर पौन तोला, बदाम २० तोला, लोणी १० तोला, मीठ २ तोला, मिरे १/३ तोला, कांदे १० तोला, गोड घट्ट दही ४० तोला, मळई २० तोला, लोणकड तूप ३० तोला, कागदीलिंबू २ (मात्र)

मांस ८० तोला स्वच्छ धुवून खेमाकरून त्यात २ तोला मीठ, साडेबारा तोला अल्याचा रस, दही १ तोला, कांद्याचे बारीक चिरलेल १० तोला, हे समग्र मिळवून त्यांत धणे २ तोला, लवंग १/६ तोला, वेलदाडा १ तोला मिरे १/३ तोला, हा मसाला वाटून मिळवावे. मग खललेल केशर, ४० तोला घट्ट दही, येका स्वच्छ रुमालात बांदून त्यांतील सर्व पाणी निचरून गेल्यावरी, ते व २० तोला बदामगिर (साल काहढून), बारीक वाटून गाळलेली मळई २० तोला, लोणी १० तोला हे समग्र मांसाचे खेम्यात मिळवून तो खेमा पाट्यावर बारीक वाटावे, (मलाई १० रुपायाभार लोणी हे सर्व जिनस मासांत मिळवून) खेम्याचे २ तोला वजनाचे टिकली एकएक टिकल्यावरून त्या ८० तोला तूपात लाल होतोरी लळून घेणे, हे खबाबावर २ कागदी लिंबाचे रस पिलोन उपयुक्त करावे.

*▪मेथिचि भाजी :*

मेथिचि भाजि ३ शेर नीट बारीक चिरून पाण्यात घालून ठेवणे. सांडगे१ शेर, पाव शेर तुपांत तळून घेऊन थोड कुटून घेणे. तळून उरल्या तूपांत घालावयाचे जिनस :- कांदे बारीक चिरून ३ तोला, जिरे पाव तोला, करेपाकाचि ढाळी१, हे ईत्यादी घालून पाणि ३ शेरही, मीट २ तोलाही घालून नीट शिजल्या नंतरे वेळून घालावयाचा सामान :- मिरे शेंगा १ तोला, मिरे १/२ तोळा, वाल्ल खोबरे २ तोला, धणे १ तोला, हळद १/२ तोला, हे समग्र भाजून बारीक वाटून घाळणे. पाव शेर चिंच कोळून घालणे. वेघळ पात्र फोडणीस ठेवून त्यात घालावयाचा जिनस :- तूप ९ तोला,बारीक चिरले कांदे २ तोला, जिरे पाव तोला, करेपाकाची ढाळी १ हे ईत्यादी घालून कांदे लाल होताच ते भाजि त्यात घालून नीट परतवून घेणे.

*सौजन्य--*लोकप्रभा - २३ जानेवारी १९९८*
*टंकलेखन - श्रीमती विजया पाटील*
*संकलन:-प्रा.र.भ.वनारसे*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*

संतवाणी - माझा मी विचार केला असे मना!!

*माझा मी विचार केला असे मना,*
*चाळवण नारायणा पुरें तुमचे॥१॥*
*तुम्हांवरी भर घातिलेसे ओझे,*
*हेंचि मी माझे जाणतसें॥२॥*
*वाऊगे बोलावे दिसे फलकट,*
*नाही बळकट वर्म आंगीं॥३॥*
*चोखा म्हणे सुखे बैसेन धारणा,*
*तुमच्या थोरपणा येईल लाज॥४॥*

चोखोबा आणि विठोबा यांच्यामधील हा 'संवाद' तरी कसं म्हणावं? इथे तर केवळ चोखोबाच बोलत आहेत नि विठोबा मात्र मुकाट्याने ऐकत आहे. ते देवाला म्हणतात,"आता मात्र मी आपल्या मनात तुझी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे माझा उद्धार करण्याचा भार नि जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आता तुम्हाला याबाबतीत 'चाळवण' (चालढकल) करून चालणार नाही. मला जे करायचे ते मी केले आहे. आता माझ्या जीवनाचे सार्थक करणं तुमच्या हाती आहे. तसं झालं नाही तर मात्र मी धरणं धरीन आणि मग तुमच्या भक्त वत्सलतेला,मोठेपणाला, महात्म्याला उणेपणा येईल. तेव्हा देवा, आता फार अंत न पाहता माझ्या उद्धारासाठी धावून ये."

हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आर्त भक्तीचा उत्कट उद्गार व आविष्कार आहे. भक्त जेव्हा अशा निर्धाराच्या शिखरावर पोहोचतो त्यावेळी तो त्यापासून मुळीच मागं हटत नाही व त्याच्या दृढनिश्चयापासून कुणीही परावृत्त करू शकत नाही.या अभंगातून आणखी एक अनुषंगिक बाब जाणवते ती अशी की, धरणं धरायची कल्पना यादव काळातही असावी! ती केवळ आजकालची नाही!!

*डॉ. यू.म.पठाण*
*टंकलेखन:-सौ.मृणाल*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*

संतवाणी

नामा यशवंत विठोबाचा शरणागत

'संपत्तीच्या बळें एक झाले आंधळे'

श्रीसंपत्ती, वैभवाच्या मृगजळामागे धावत राहून मंडळी मदांध होऊन बसतात.

'वेढिले कळिकाळे स्मरण नाही'- कळिकाळाने आपल्याला सर्व बाजूंनी ग्रासून टाकले आहे,हे त्यांच्या ध्यानीमनी येत नाही.

'विद्यावंत जातीच्या अभिमाने!नेले तमोगुणे रसातळा'
काहींना ज्ञानाचा,विद्याकलेचा तर कुणाला आपल्या जातीचा अभिमान असतो. भक्तभगवंताचे असे नसते.

नामदेवराय लिहितात...

आम्ही विठोबाचे दूत॥यम आणू शरणागत॥
मुखे नाम हातीं टाळी॥महापापा करू होळी॥
करूं हरिनामाचा घोष॥कुंभपाक पाडू ओस॥
करूं हरिकथा कीर्तन॥तोडू यमाचे बंधन॥
एवढा प्रताप नामाचा॥रिघ नव्हे कळिकाळाचा॥
ऐसा नाम यशवंत॥विठोबाचा शरणागत॥

आम्ही श्रीपांडुरंग विठ्ठलाचे दास आहोत,निष्ठावान सेवक आहोत. आम्ही निडर आहोत. साक्षात यमराजालाही शरणांकित करू. मुखाने नित्य हरिनाम आणि हाताने आनंदाची टाळी वाजवितो. त्यायोगे महापापाचा विध्वंस करतो. विनाश करतो. आमचे शस्त्र हरिनामाचे आहे. केवळ त्या नामध्वनीने आम्ही कुंभपाक नरक ओस पाडू,रिकामा करू. हरिकथा कीर्तनाच्या योगाने यमाच्या शृंखला तोडून टाकण्याची आमच्यात ताकद आहे.

नाममंत्राचा प्रभावच इतका जबरदस्त असतो की,त्याच्यापुढे कळिकाळाचा टिकाव लागू शकत नाही.

नामदेवराय सांगतात- मी स्वतः विठ्ठलाला मनोभावे शरण जाऊन यशवंत झालो.सर्वच बाबतीत सुखीसमाधानी होऊन जयवंत होऊ शकलो.

डॉ.अशोक कामत
टंकलेखन:-सौ.मृणाल
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

बेलरीव्ह ओव्हल स्टेडीयम

बेलरीव्ह ओव्हल हे ऑस्ट्रेलियातील क्लॉरेन्स या शहरात आहे. हे हॉबर्टच्या किनाऱ्यावर आहे. या मैदानावर मुख्यत्वे क्रिकेट आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्यासाठी हे मैदान वापरले जाते. या मैदानाची आसन क्षमता १६००० इतकी आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील २००९ च्या सामन्यांच्या वेळेस मात्र अतिशय गर्दी होवून १६७१९ प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेतला. हे मैदान येथील राज्य क्रिकेट संघटना, टस्मानीयन टायगर्स यांचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते. १९८९ पासून येथे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळण्यास सुरुवात झाली. १९८८ साली येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १६००० दशलक्ष डॉलरचा खर्च करून या मैदानाचे नुतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणामध्ये इनडोअर सामन्यांसाठी नेट असलेले बंद हॉल्स, कलादालने, ६००० वाढीव प्रेक्षक क्षमतेच्या दक्षिणेच्या बाजूचा स्टँड, प्रसिद्धी माध्यमे, पत्रकार, रेडीओ, दूरदर्शन, आकाशवाणी या सर्वांसाठी येथे आधुनिक पद्धतीने सोय करण्यात आली आहे. तसेच येथील मैदानाचे सभासद, टीसीए अधिकारी आणि खेळाडू यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला या मैदानावर क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने होत. १८८४ ला येथे पहिली फुटबॉल मॅच खेळल्या गेली. १९१३ मध्ये बीच, चर्च आणि डेरवेन्ट स्ट्रीट मध्ये असलेला हा जमिनीचा तुकडा क्लॉरेन्स कौन्सिलला विकला गेला आणि त्यानंतर १ वर्षाने येथे चांगले मैदान तयार होवून ते खेळण्यास उपयुक्त झाले. या मैदानावर वेळोवेळी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. १९८९ ला पूर्वीचा धावफलक बदलून त्याजागी इलेक्ट्रॉनिक धावफलक उभारण्यात आला. तसेच प्रकाशझोतांची सोय करण्यात आली. आता या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात.

टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम हे क्रिकेटचे मैदान असून ते श्रीलंकेत कोलंबो येथे आहे. जून १९९४ च्या आधी हे स्टेडीयम खेत्तारमा क्रिकेट स्टेडीयम या नावाने ओळखले जात असे. आज हे मैदान श्रीलंकेतील खेळाडूंसाठी एक प्रमुख मैदान म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे स्टेडीयम आहे. ३५००० आसन क्षमतेच्या श्रीलंकेतील सर्वात मोठ्या स्टेडीयम च्या निर्मितीची धुरा रणसिंगे प्रेमदासा यांनी पुढाकार घेवून सांभाळली. श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या पहिल्या सामन्याने या स्टेडीयम चे उद्घाटन करण्यात आले होते. हे स्टेडीयम एक पाणथळ जागेवर बांधण्यात आलेले आहे. स्टेडीयम बांधण्याच्या पूर्वी खेत्तारमा मंदिरात जाणारे भक्त या जागेतून जातांना बोटीचा वापर करून पलीकडे जात असत. या मैदानावरील पहिल्या आंतर राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे उद्घाटन ५ एप्रिल १९८६ रोजी श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाले. यावेळची या मैदानावरील एक अविस्मरणीय घटना म्हणजे येथे ९५२/६ अशा धावा काढून सर्वोच्च जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. १९९७-१९९८ साली खेळण्यात आलेल्या या सामन्यात सनथ जयसूर्या याने ३४० धावा तर रोशन महानामा याने २२५ धावा काढल्या. दुसऱ्या विकेट साठी या दोघांची भागीदारी ५७६ धावांची होती. अजूनही हा सामना जागतिक विक्रम जपणारा आहे. या मैदानाची धावपट्टी संथ असल्यामुळे येथे चेंडू उसळतो. या मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले असून सरावासाठी येथे १६ धावपट्ट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.  २००३ साली खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनी मॅक्स क्रिकेट अकॅडमीतील खेळाडूंसाठी येथे राहण्याची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे.

टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

सेडॉन पार्क स्टेडीयम

सेडॉन पार्क स्टेडीयम हे मैदान न्यूझीलंड मधील हॅमिल्टन या शहरात आहे. हॅमिल्टन हे न्यूझीलंड मधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच तेथील सुरेख वातावरणामुळे व्हिलेज ग्रीन या नावाने हे शहर प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्यामुळे पिकनिक स्पॉट म्हणून अनेक निसर्ग प्रेमी येथे सहलीला येतात. येथील सेडॉन क्रिकेट स्टेडीयम हे न्यूझीलंडमधील दोन नंबरचे सर्व सुखसोयींनी समृद्ध असे मोठे मैदान आहे. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान रिचर्ड जॉन सेडॉन यांचे नाव या स्टेडीयमला देण्यात आले आहे. हे स्टेडीयम ट्रस्ट बँक पार्क म्हणूनही ओळखले जाते. तसेच वेस्टपॅक ट्रस्ट पार्क आणि वेस्ट पॅक पार्क अशा प्रकारची त्यातील काही भागांना नावे देण्यात आली होती. परंतु २००६ साली वेस्टपॅक ट्रस्ट बँक न्यूझीलंड यांनी ठरवले कि प्रत्येक खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी मैदानाचे वेगवेगळे भाग आणि त्यासाठी वेगवेगळे प्रायोजक असण्यापेक्षा हि सर्व नावे मागे घेवून फक्त सेडॉन पार्क याच नावाने हे स्टेडीयम ओळखले जाईल.

२००६-२००७ पासून या स्टेडीयम चे सेडॉन पार्क हेच नाव निश्चित करण्यात आले. सेडॉन पार्क या मैदानाचा आकार हा संपूर्णतः गोल आहे. क्रिकेट मैदानाच्याच दृष्टीने मग या मैदानावर क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेडॉन पार्क हे मैदान अतिशय उत्तम तऱ्हेच्या हिरवळीने सजवलेले मैदान आहे. या हिरवळीवर मध्यभागी नऊ धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सरावासाठी किंवा सामन्यांसाठी आलटून पालटून उत्कृष्टपणे तयार केलेल्या धावपट्टीवर खेळता यावे. या सर्व धावपट्ट्या या दक्षिणोत्तर आहेत. फलंदाजी साठी उत्कृष्ट अशा या धावपट्ट्या आहेत या मैदानाच्या बाहेरच्या बाजूने उंच आणि भव्य असे कुंपण घातलेले आहे. समोरच्या बाजूला धावफलक असून त्यावर खेळणाऱ्या संघांच्या खेळाडूंची नावे उद्धृत केलेली असतात. तसेच धावांचा बदलता निर्देशही  त्यावर असतो. हे मैदान क्रिकेट प्रमाणे इतर अनेक खेळ आणि कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. क्रिकेटचा मोसम नसतांना तेथे हॉकी, रग्बी आणि रग्बी लीग यांचे सामने घेतले जातात. याशिवाय अनेक समारंभासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या मैदानाची पाणी निचरा होण्याची पद्धत हि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून ती उत्कृष्टपणे कार्यक्षम असल्यामुळे मैदानावर पाणी साठून राहात नाही. येथे आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळले जातात. नऊ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने येथे खेळविले गेले आहेत.

टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

नोटेवर सिंहाचे चित्र

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने ब्रिटिश चलन बंद केले आणि १९४९ साली १ रुपयाच्या नोटेचे डिझाइन तयार केले. पूर्वी या नोटेवर असणारे जॉर्ज V चे छायाचित्र काढून त्या जागी महात्मा गांधींचे चित्र टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाला. मग त्याऐवजी राजा अशोकाच्या चक्रातील सिंहाच्या चित्राची निवड करण्यात आली. नोटेचा आकार वाढवून त्यावर सिंहाचे चित्र आणि मुख्यत्वे त्यावरील मजकुरासाठी इंग्रजी सह हिंदी भाषा वापरण्यात आली. पुढे १९६० मध्ये आर्थिक संकटांमुळे या नोटेचे आकारमान लहान करण्यात आले. त्यानंतर जास्त किमतीच्या म्हणजे १०,००० किमतीच्या नोटा बंद करण्यात आल्या.

टंकलेखन:-प्रियांका कुंटे
संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

नोटांची महात्मा गांधी मालिका

भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण अर्थातच १९५० नंतर भारतात भारतीय चलनाची सुरुवात झाली. या चलनातील नाणी व नोटा संपूर्ण भारतीय ठेवणीच्या असाव्या म्हणून पूर्वीच्या ब्रिटिशांकीत भारतीय नोटांमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आले. त्यासाठी नोटेचे नवीन डिझाइन तयार करण्यात आले. नोटेवर अशोक चित्रातील सिंहाची प्रतिकृती वापरण्यात आली तर त्यानंतर बऱ्याच वर्षांनी नोटांच्या स्वरूपात बदल करण्यात आला. यावेळेस विविध किमतीच्या भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापण्यात आले. अशाप्रकारे नोटांची नवीन 'महात्मा गांधी मालिका' सुरु करण्यात आली. यावेळी या मालिकेच्या विविध किमतीच्या नोटांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल करण्यात आले.

टंकलेखन:-प्रियांका कुंटे

संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Sunday, June 18, 2017

इतिहासाचा साक्षीदार - शनिवारवाडा

बालमित्रांनो,

पुण्याच्या मध्यवस्तीत मोठ्या दिमाखात उभी असलेली आणि एकेकाळचे मराठा साम्राज्याचे सेनानी पेशवे यांचे निवासस्थान असलेली मी एक ऐतिहासिक वास्तू.  माझं महत्त्व जाणून भारत सरकारनं मला महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं.  बरोबर ओळखलंत मित्रांनो!  मी शनिवारवाडा बोलतोय.

मित्रांनो, पेशवाईच्या कालखंडात आपल्या कर्तृत्वान पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता.  या काळात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातूनच हलत असल्यानं पुणे हे सत्ता केंद्र झालं होत.  मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी गादी असावी, या हेतूनं थोरले बाजीराव पेशवे यांनी पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचं ठरवलं.  वास्तूसाठी योग्य जागा मिळाल्यावर १० जानेवारी १७३० रोजी त्यांनी या वास्तूचा भूमीपूजन समारंभ केला.  बाजीराव पेशव्यांनी हि वास्तू बांधून घेण्याचं काम अतिशय जलद गतीनं पूर्ण करुन घेतलं.  अवघ्या दोन वर्षात पाच एकर क्षेत्रफळात वसलेला मराठी सत्ता व वैभवाला साजेसा सहा मजली आलिशान प्रासाद तयार केला.  वास्तुपुजन समारंभ २२ जानेवारी १७३२ रोजी झाला.  या दिवशी शनिवार असल्यानं माझं नामकरण 'शनिवारवाडा' असं करण्यात आलं.  माझ्या बांधकामासाठी त्याकाळी १६ हजार ११० रुपये खर्च आला. बाजीरावांच्या जीवनशैलीप्रमाणंच माझी बांधणी केली होती.

मित्रांनो, आज केवळ अवशेष रूपात मी तुम्हाला दिसत असलो, तरी माझ्या बांधकामाच वर्णन अचंबित करणारं आहे.  तब्बल २१ फूट उंच आणि चारही बाजूनी ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत अशी माझी बांधणी केली होती.  माझा मुख्य प्रासाद सहा मजली होता.  आळंदीच्या देवळाचा कळस माझ्या सहाव्या मजल्यावरून दिसत असे.  आज दिसणाऱ्या दिल्ली दरवाजावर असलेल्या नगारखान्याच्या उंचीवरून माझ्या प्रासादाच्या उंचीची कल्पना तुम्हाला येऊ शकते.

माझ्या भोवतालच्या भिंतींना पाच मोठे दरवाजे होते.  दिल्ली दरवाजा, अलीबहाद्दर किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि  नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा या नावांनीच आजही हे दरवाजे ओळखले जातात.  सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून, अणकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्टया ठोकून ते भक्कम केले आहेत.  यातील दिल्ली दरवाजातून आत गेल्यावर एका बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता.  याच्या मध्यभागी भगवं निशाण फडकत असे.  माझ्या पटांगणावर चौक बांधले होते. आग्नेयकडील चौकाला लाल चौक किंवा बाहेरील चौक म्हणत.  नैऋत्येकडील चौकाला मोतीचौक किंवा गोपिकाबाईंचा चौक नाव होतं.  वायव्येकडील चौकाला हिरकणी चौक किंवा मधला चौक या नावानं ओळखलं जात असे.  शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकाला माणिकचौक किंवा हौदाचा चौक म्हणत.  या मोठ्या चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक पक्वान्नचौक असे अनेक पोटचौक होते.  या सर्व चौकात मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसे महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल असे अनेक महाल, दिवाणखाने व देवघरे होती.  याशिवाय जामदारखाना, जिन्नासखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पिलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबुतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकातून केली होती.  कात्रजच्या तलावातून आत पाणी आणलं होतं.  सभा मंडपावर चित्रे कोरलेली होती. हिरकणी चौकीतील गणपती महालात रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रं होती.  याशिवाय पश्चिम तटाला घोड्यांची पागा आणि गोशाळा होती.

माझ्या संरक्षणासाठी सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, ५०० स्वार आणि अंतर्गत बंदोबस्तासाठी एक हजारहून अधिक नोकर होते.  सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी माझ्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या.  नवीन खोल्या, दिवाणखाने, टॉवर आणि कारंजी बांधली.

मित्रांनो, माझ्या या वैभवाला १७९१, १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्या.  यामुळं सौंदर्य ढासळलं.  यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ मध्ये माझा ताबा ब्रिटिशांनी घेतला आणि आपलं निशाण लावलं.  पेशव्यांचं वास्तव्य संपून पुण्याचे पहिले जिल्हाधिकारी हेन्री डंडास रॉबर्टसन इथं राहायला आले.  दिवाणखान्याची जागा तुरुंग, पंगुगृह, पोलिसांच्या निवासस्थानांनी घेतली.  पुढं १८२८ मध्ये मला मोठी आग लागली व त्यात बहुतेक सर्व इमारती जळाल्या.  फक्त नगारखाना आणि आरसेमहाल शिल्लक होता.

आरसे महालही काळाच्या ओघात नष्ट झाला.  आज जोते, कारंजी, बुरुज आणि भक्कम असा दिल्ली दरवाजा मूळ रुपात तुम्ही पाहू शकता.  तत्कालीन इतिहासाची साक्ष देत अवशेषांच्या रुपात मी उभा आहे.  नुकत्याच प्रदर्शित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटामध्ये माझं भव्य रुप दाखविण्यात आलं व तेव्हापासून मला पाहायला गर्दीही होते आहे.  इतिहास जाणून घेण्यासाठी मला भेटायला नक्की या !

टंकलेखन-अमोल शिंपी
संकलन-प्रा.र.न.वनारसे

पहिली पावले

कोणत्याही देशाचे लोक परकीय
सत्ता मनोमन स्वीकारत नसतात त्यांच्या मनात असलेल्या सुप्त असंतोषाचा भडका उडण्याचे कारण आपण देऊं नये,या बाबत भारतातील ब्रिटिश सत्ता  अत्यंत जागरूक होती. ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यास राजसत्तेने उत्तेजन दिल्यास लोकक्षोभ होईल व आपल्या हितसंबंधांना  धोका पोचेल,या भीतीन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या ताब्यातील क्षेत्रात मिषणार्यांना परवानगी दिली नव्हती .,कलकत्ता जवळ प्रारंभी असलेले आपले मिशन आणि मंद्र
मुद्रणालय  विल्यम कँरेला कंपनीच्या अधिकार  क्षेत्राबाहेर श्रीरामपुरला न्यावे लागले होते,परंतु भारतीयांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारुन आपला उद्धार करवुन घ्यावा, अशी  ब्रिटिश सरकार व ईस्ट इडिया कंपनी दोन्हीमधील  अनेक अधिकार्यांची मनोमन ईच्छा होती.

१८१३मध्ये भारतात राज्यचारभार करण्याची परवानगी देणार्‍या सनदैचे नुतनीकरण करताना, त्यांत ख्रिस्ती धर्मप्रसाराची मुभा देणारे कलम घालण्यात आले व मोठ्या प्रमाणात भारतात मिशनरी आले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आलेल्या  या मिशनर्‍यांनी येथील लोकभाषा आत्मसात केली.हिंदु धर्मातील अनिष्ट रुढींवर टीका करण्यासाठी मराठीत छोट्या पुस्तिका तयार केल्या. बायबल व त्यातल्या गोष्टींची भाषांतरे प्रसिद्ध केली. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा, या दोन माध्यमातुन लोकांकडे जाण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यांनी ग्रजी व मराठी भाषा व इतर विषय शिकवणार्या शाळा काढल्या.

ज्ञानप्रसाराच्या या कार्याबरोबरच आपल्या मुळ उद्देशाला अनुसरुन! ख्रिस्ती धर्मप्रसाराचे मिशनर्यांचे प्रयत्न चालुच होते. त्यांचे हे काम सोपे नव्हते.मिशनर्यांचे विचार किंवा त्यांचे काम यांनाच फक्त विरोध होई असे नाही.प्रसंगी त्यांची वैयक्तीक अवहेलनाहि होई. मात्र त्यांच्या शांतपणे व चिकाटीने चाललेल्या प्रयत्नांची फळे दिसु लागली होती.१९३८ मध्ये धनाजीभाई नवरोजी  व होर्मसजी पेस्तनजी या अननुक्रमे साडेसोळा व एकोणिस वर्ष वयाच्या दोन पारशी तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.पारशी समाजात त्यामुळे मोठी खळबळ उडाली.
दोन पारशी मुलांच्या धर्मांतरामुळे उडालेली खळबळ शांत झाली नसतानाच ,पाच वर्षांच्या अवधीत दुसरे एक धर्मांतर प्रकरण उद्भवले.परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राचा मुळ रहिवासी असलेला एक ब्राम्हण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत येऊन राहिला होता.नारायण आणि श्रीपत या दोन मुलांना जनरल असेंब्लीच्या मिशनरी शाळेत त्याने १८३८ व १८४१ मध्ये प्रवेश दिला होता,मोठा मुलगा नारायण यास १८४२ मध्ये त्याच शाळेत शिक्षक म्हणुन नेमण्यात आले होते.त्याने १३सप्टेंबर १८४३रोजी रे. नेस्बिट यांच्याकडुन बाप्तिस्मा घेऊन, ख्रिस्ती धर्म स्वीकारला.मुंबईतील हिंदु समाजात या धर्मांतराची गंभीर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.

नारायण हा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान होता.मात्र त्याच्याबरोबर मिशनच्या जागेत राहणारा धाकटा भाऊ श्रीपत याची तेथुन मुक्तता करुन ,त्याचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे पुढारी मंडळींनी ठरविले.
श्रीपत ताब्यात आला,तरी प्रश्न संपले नाहीत.मुलगा बरेच दिवस मिशनर्यांच्या जवळ राहत होता,त्यांच्या हातचे त्याने भक्षिले असणार. त्याच्या हातुन कदाचित अभक्ष्य भक्षण वा अपेयपान घडले असणार! रिकाम्या मंडळींच्या मनात नानाशंका होत्या. या मुलाच्या  शुद्धीकरणासाठी बाळशास्री जांभेकर यांनी पुढाकार घेतला.पुणे,नाशिक आणि मुंबई येथे त्याबद्दल वार झडले. करवीर मठाच्या जगद्गुरुंनी त्याला प्रायश्चित्त देऊन, शुद्ध करुन घ्यावे,असे आज्ञापत्रही पाठविले;परंतु प्रायश्चित्तानंतरही शुद्धी होते,हे काही सनातन्यांना मान्य नव्हते. शुद्धी करुन घेण्यात पुढाकार घेणार्या बाळशास्रींना ग्रामण्याचा~सामाजिक बहिष्काराचा त्रास सहन करावा लागला.

मिशननच्या  शाळांच्या जोडीला सरकारी शाळा निघाल्या व बोर्ड आँफ एज्युकेशन स्थापन झाले,तरी सर्व वर्गासाठी नवी क्रमिक पुस्तके तयार झाली नव्हती.ते काम सुरु होते; परंतु अद्यापही इंग्लंडमध्ये वापरली जाणारी पुस्तके काही प्रमाणांत वापरण्यात येत होती. त्यात ख्रिस्ती धर्माची माहिती देणारे धडेही होते.अशा शिक्षणामुळे धर्मांतराकडे प्रवृत्ती होते,असे वाटुन त्याविरुद्ध १८५७ मध्ये अर्ज झाला. त्यामुळे धार्मिक स्वरुपाचे धडे शिकविण्यात येऊ नयेत,असा आदेश सरकारने काढला.

मिशनरी वृत्तीने ,हिंदु धर्ममंडनाचे काम केले,असे महत्वाचे हिंदु धर्मसमर्थक म्हणजे विष्णु भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रम्हचारी (१८२५७३) ,वयाच्या तेविसाव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करुन त्यांनी साधना केली. तीन वर्षे पंढरपुरात  व नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी प्रवचने दिली.जातपात न मानणारे , स्री~पुरुष दोघांनीही ज्ञानसंपादनात सहभागी व्हावे असे मानणारे विष्णुबुवा हे काळाच्या मानाने पुरोगामीच होते.१८५६च्या सुमारास ते द्वारकेस जाण्यासाठी मुंबईस आले.तेथे काही श्रीमंतांच्या  वाड्यात त्यांची प्रवचनेही झाली. परंतु अशा प्रवचनांस अस्पृश्य समजल्या जाणार्यांना हजर राहता येत नसे.त्यामुळे व ख्रिस्ती मिशनर्यांना जाहीर उत्तर द्यावे;म्हणुन १८५७ मध्ये जानेवारी ते जून असे चार साडेचार महिने  मुंबईच्या समुद्रकिनार्यावर त्यांनी मिशनर्यांशी जाहीर वाद केला.विविध धर्माचे लोक या चर्चा व वाद ऐकण्यास येत.वादविवाद शांततेने पार पडत व दुसर्याचे मत शांतपणे ऐकुन घेतले जाई. प्रवचने व वादविवाद या माध्यमाप्रमाणेच विष्णुबुवांनी ग्रंथरचना करुनही,आपले विचार प्रस्तुत केले.

'वेदोक्त धर्मप्रकाश' या आपल्या पुस्तकात त्यांनी वैदिक धर्माची तत्वे,वर्णव्यवस्था,जातिभेद इत्यादींचे विवेचन केले व ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदु धर्मावरील आक्षेपांना उत्तरे दिली आहेत.दोन परस्परविरोधी धर्मस्वरुपांबद्दलचा जाहीर वाद व लोकशिक्षण या संदर्भात विष्णुबुवांचे कार्य वैचारिक संवादाच्या इतिहासात फार महत्वाचे आहे.साम्यवादी तत्वज्ञानाला जवळचे  वाटणार्या कम्युन पद्धतीच्या जीवनाचा पुरस्कार करणारे विचार मांडणारा 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ' हा विष्णुबुवांचा निबंध तर प्रसिद्धच आहे.
काही मोजकीच धर्मांतरै समाजाच्या प्रतिष्ठित वर्गात घडुन आली,ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित होऊ पाहणार्या हिंदु सुशिक्षित तरुणांना धर्मांतराची शैवटची पायरी गाठावी,असे मात्र वाटत नव्हते. म्हणुनच परमहंस सभेचे एक प्रेरक व ख्यातनाम व्याकरणकार दादोबा पांडुरंग आणि महात्मा जोतिबा फुले व त्यांचे वाळवेकरांसारखे मित्र यांना ख्रिस्ती धर्माचे आकर्षण काही काळ वाटले,तरी आपण धर्मांतर करावे, असे वाटले नाही. हिंदू धर्मशोधनाच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात झालेला पहिला संस्थात्मक प्रयत्न म्हणजे परमहंस सभा. दादोबा पांडुरंग सुरत येथे असताना येथील सरकारी शाळेतील एक शिक्षक दुर्गाराम मंछाराम मेहता यांच्या सहकार्याने 'मानव धर्मसभा' या नावाची एक संस्था त्यांनी स्थापली. सभेच्या धर्मविचारांचा ऊहापोह करणारी 'धर्मविवेचन' या नावाची एक पुस्तिकाही  दादोबांनी लिहीली.पुढे दोन वर्षांनी म्हणजे १८४६ मध्ये दादोबा मुंबईस आले.दादोबा नोकरीनिमित्त नेहमी फिरतीवर राहत असल्याने, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या तरुणास अध्यक्ष करुन,मानव धर्मसभेचे विचार असणारी 'परमहंस सभा' दादोबांनी स्थापली.  (याच जयकरांना महात्मा फुल्यांनी आपला 'शिवाजीचा पोवाडा' अर्पण केला आहे.) या सभेचे कामकाज गुप्तपणे चालावे,असे ठरविण्यांत आले होते.या सलेच्या आद्य सदस्यांत दादोबा पांडुरंग , रामकृष्ण बाळकृष्ण जयकर,भिकोबा दादा चव्हाण,  'मुक्तामाला '  कादंबरीचे लेखक लक्ष्मणशास्री हळबे, 'यमुना पर्यटन' कार बाबा पद्मनजी आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांसारखे लोक होते. परमहंस सभेच्या बैठकीत जातिभेद आपण मानत नाही,हे जाहीर करण्यासाठी ख्रिस्ती बेकरीत तयार झालेला पावाचा तुकडा खाणे आणि परजातीतील माणसांच्या हातचे घोटभर पाणी पिणे आवश्यक करण्यात आले होते. परमहंस सभेने केलेला गुप्ततेचा नियम व उघडपणे आपली मते प्रतिपादन करणे, लोकमत अनुकूल करुन घेण्यासाठी लागणारे मनोधैर्य नसणे या दोन्हीमुळेपरमहंस सभेच्या वतीने फारसे कार्य  होऊ शकले नाही.
याच काळात राजा राममोहन राँय यांच्या विचाराने प्रेरित होऊन , 'ब्राम्हो समाज' नावाची एक संस्था बंगालमध्ये स्थापन झाली होती.ईश्वर एक आहे व इतर कर्मकांडांऐवजी प्रार्थनेसारख्या शुद्धोपासनेने कोणत्याही मध्यस्थीशिवाय   व्यक्तीला ईश्वराकडे जाता येते,असे मानणार्या या पंथाचे पंडित शिवनाथ शास्री व केशवचंद्र सेन यांसारखे पुढारी मुंबईत येत असत.त्यांच्याशी झालेल्या विचारांच्या देवाण~घेवाणीने मुंबईतील मामा परमानंद , डाँ आत्माराम पांडुरंग  आदींना अशीच एखादी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी,असे वाटु लागले. डिसेंबर १८६६मध्ये एक प्राथमिक बैठक होऊन,  ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी नोकरीनिमित्त बाहेरगांवी असलेल्या रामकृष्णपंत भांडारकर,महादेव गोविंद रानडे, वामनराव मोडक हे नंतर  प्रार्थना समाजात सामील झाले.व त्याचे अध्वर्यू झाले .

ब्राम्हो समाज आणि प्रार्थना समाज  यांचे सर्वसाधारण स्वरुप एकच असले , तरी तपशिलाचे मात्र काही फरक होते.मूर्तिपूजा आणि जातिभेद दोघांनाही मान्य नसले , तरी ब्राम्हो समाजाच्या सभासदाला दोन्हीचा निषेध जाहीरपणे करावा लागे. हिंदूंच्या सण आणि समारंभांत प्रार्थना समाजाचे सदस्य सामाजिक दृष्टीने भाग घेत;मात्र त्यांच्या लेखी त्या सणांना धार्मिक महत्व नसे. ब्राम्हो समाजाची व्याप्ती प्रार्थना समाजापेक्षा कितीतरी अधिक होती;परंतु ब्राम्हो समाज हा इतर हिंदू समाजापासून वेगळा पडला. प्रार्थना समाजाचे तसे झाले नाही. उपनिषदे आणि गीता यांच्याबरोबरच अर्वाचीन मराठी साधूसंतांचा उपदेशही प्रार्थना समाज आदरणीय मानत असे.प्रत्यक्ष उपासनेत या संतांच्या__ विशेषतः तुकारामांच्या वचनांचा आधार घेतला जाई.  समाजाच्या 'प्रार्थना मंदिरा' त साप्ताहिक उपासना होई. प्रार्थना ,तद्नंतर  एखाद्या संतवचनावर निरुपण ,असे  मुख्यतः उपासनेचे स्वरुप असे.
आपल्या सार्वजनिक कार्याची पहिली...धर्मशोधनाची प्रेरणा

मूळ लेख - न्या. नरेंद्र चपळगांवकर
टंकलेखन-वृषाली गोखले
संकलन.प्रा.र.न.वनारसे

टिळक आणि टागोर - टिळकांची दूरदृष्टी- मनोज्ञ दर्शन

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील पंचविसावा लेख :

लोकमान्य टिळकांच्या राजकीय कर्तृत्वाचा एक पैलू बराचसा अपरिचित राहिला आहे, तो म्हणजे लोकमान्य टिळकांनी इंग्लंडमधील लेबरपार्टीशी १९०७पासून जोडलेले स्नेहाचे संबंध आणि परदेशात विशेषतः इंग्लंडमध्ये भारताच्या राजकीय आकांक्षेचा स्वराज्याचा केलेला प्रचार. लोकमान्य टिळकांच्या १५१ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या राजकीय दूरदृष्टीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
           
 स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, या लोकमान्य टिळकांच्या चैतन्यदायी शब्दांनी असंख्य भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्वाला उफाळली. लोकांची राजकीय आकांक्षा जागृत करण्यासाठी टिळकांनी त्यांची लेखणी आणि वाणी यांचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखातून ब्रिटिश सरकारच्या
जुलमी धोरणावर कठोर टीका केली आणि लोकांना त्यांच्या देशाबद्दलच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. १८९७ मध्ये टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात येऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.१९०८ मध्ये भारतातील पहिल्या बॉम्बस्फोटानंतर टिळकांनी जे अग्रलेख लिहिले त्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात आला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा होऊन ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात पाठविण्यात आले. टिळकांनी या शिक्षा निर्भयतेने भोगल्या. त्यामुळेच त्यांना लोकमान्यत्व प्राप्त झाले आणि त्यांच्या स्वराज्य हा माझा  जन्म सिद्ध हक्क आहे या शब्दांना मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले. राजकीय नेत्याचे प्रमुख कार्य वर्तमानकाळातील समस्यांची सोडवणूक करणे , हे असते. लोकमान्य टिळक त्यांच्या काळातील सर्व समस्यांना सामोरे गेले आणि त्या सुटाव्यात, यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्षही केला. हे करतानाच टिळकांनी भविष्यकाळाचा वेध घेतला.
                   
त्यावेळी इंग्लंडमधील राजकारणात कॉन्झर्वेटीव्ह पार्टी आणि लिबरल पार्टी हे दोन प्रमुख पक्ष होते. त्याचबरोबर लेबर पार्टी नव्याने उदयास येत होती.  कॉन्झर्वेटीव्ह पक्षाचे नेते कट्टर साम्राज्यवादी होते.भारताला हळूहळू राजकीय हक्क दिले पाहिजेत, याची जाणीव होती. लेबरपार्टी नव्यानेच स्थापन झाली होती. असे असूनही टिळकांनी, लेबर पार्टीशी आपण संबंध जोडणे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे, हे अचूक ओळखले होते. हि त्यांची राजकीय दूरदृष्टी होती.
         
ऑक्टोबर १९०७ मध्ये जेम्स केर हार्डी हे लेबर पक्षाचे एक पुढारी भारतात दौऱ्यासाठी आले होते. टिळकांनी त्यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आणि निमंत्रण स्वीकारून केर हार्डी पुण्यात आल्यानंतर त्यांनी केसरी कार्यालयास ; तसेच सार्वजनिक संस्था आणि अन्य संस्थांना भेटी दिल्या. सार्वजनिक सभेतर्फे  केर हार्डी यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांचे स्वागत करताना टिळकांनी त्यांच्या समोर भारतातील तत्कालीन स्थितीचे चित्र रेखाटून भारताची राजकीय आकांक्षाही व्यक्त केली. केर हार्डी यांनी ‘ मी इंग्लंडला परत गेल्यावर तेथील लोकांना आणि विशेषतः लेबर पक्षातील माझ्या सहकाऱ्याना भारताचा प्रश्न समजावून सांगेन’ असे अभिवाचन दिले. भारताची राजकीय चळवळ प्रभावी करतानाच इंग्लंडमधील लोकांना आपला प्रश्न समजून सांगितला पाहिजे, हे टिळकांनी बरोबर जाणले होते. लेबर पार्टी हा नव्याने उदयाला आलेला पुरोगामी पक्ष आहे, हे जाणल्यामुळेच त्यांनी केट हार्डी यांचे स्वागत केले. आणि त्यांच्यामार्फत लेबर पार्टीशी संबंध जोडण्यास सुरवात केली.
           
लोकमान्य टिळक काँग्रेसमधील त्यावेळचे एक प्रमुख नेते विट्ठलभाई पटेल याना म्हणाले, ‘प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधी अन्य देशांमध्ये त्यांच्या देशाची बाजू मांडतात. आजजरी हिंदुस्थान परतंत्र असला तरी आपले राजकीय उद्दिष्ट आणि आपण राज्य कसे करू शकू, हे जगाला समजलेच पाहिजे.’ विट्ठलभाई पटेल म्हणाले, “पण आपला लढा तर आपल्यालाच काढावा लागेल ना?” टिळक म्हणाले “हे तर खरेच आहे, भारतीय जनतेला भारताच्या भूमीवरच आंदोलन करून स्वराज्य मिळवावे लागेल; पण त्याच बरोबर जगात सगळीकडे आपले मित्र असले पाहिजेत आणि विशेषतः इंग्लंडमधील लोकांना आपली भूमिका समजली पाहिजे, असे मला वाटते.”

इंग्लंडमध्ये भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी टिळकांना श्यामजी कृष्ण  वर्मा हे एक विश्वासू सहकारी मिळाले. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पूर्वी सौराष्ट्रातील काही संस्थांनांमध्ये दिवाणाचे काम केले होते, त्यामुळे त्यांना भारताच्या परिस्थितीचे उत्तम ज्ञान होते. पुढे ते इंग्लंडला गेले आणि बॅरीस्टर होऊन त्यांनी त्या व्यवसायात उत्तम यश मिळविले. टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडन मध्ये ‘इंडियन सोशिओलॉजिस्ट’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. ‘इंडियन सोशिओलॉजिस्ट’ मधून भारताच्या दारिद्र्याचे विदारक चित्र आकडेवारीनिशी वर्मा मांडत आणि त्याचबरोबर भारताला स्वराज्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखातून आग्रहाने प्रतिपादन करीत. इंग्लंडमधील मुद्रण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन वर्मा ब्रिटिश सम्राज्यवाद्यांवर कठोर टीका करीत असत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची एक अभिनव योजना वर्मा यांनी सुरु केली, आणि टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाचे असे ठरले. सावरकराना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्म यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची इंडिया हाऊस मध्ये राहण्याची सोयही केली.  इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशातही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहकाऱ्यांमध्ये मॅडम काम या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्या प्रभावी वक्त्याही होत्या.१९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टूट गार्ट येथे जागतिक समाजवादी परिषद भरली होती. मॅडम कामा या त्या परिषदेस हजर राहिल्या.त्यांनी त्यांनी स्वतः तर भारताचा ध्वज फडकविला आणि त्या म्हणाल्या, “हा ध्वज भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यप्रेमी समाजवादी मित्रांनो, या ध्वजाला साथ द्या आणि जगातील एक पंचमांश जनतेला पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी भारताला साह्य करा.” मॅडम काम यांच्या कर्तृत्वाची हकीकत टिळकांना समजली, त्या वेळी त्यांना फार समाधान वाटले. वर्मा यांनी सूचना आणि साह्य केल्यामुळे मॅडम काम यांनी अमेरिकेचा दौरा केला आणि व्याख्यानांतून तेथील लोकांसमोर भारताची बाजू मांडली.टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्वाचा होता.

१९१९ मध्ये इंग्लंडमधील जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे निवेदन सादर करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे जे शिष्टमंडळ गेले होते त्याचे नेतृत्व विट्ठलभाई पटेल हे करीत होते. लोकमान्य टिळक हे होमरूल लीगच्या  शिष्ठमंफळातर्फे पार्लमेंटरी कमिटिस निवेदन देणार होते. या दोनही शिष्टमंडळानि परस्परांशी सहकार्य करून भारताची राजकीय हक्कांची मागणी एकमुखाने इंग्लंडच्या पार्लमेंटरी कमिटीसमोर मांडली.

याच सुमारास इंग्लंडमध्ये पार्लमेंटच्या निवडणूका होणार होत्या. टिळकांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. नोव्हेंबर १९१८ मध्ये टिळकांनी लेबर पार्टीच्या निवडणूक फंडास मदत म्हणून २०००पौंडांचा चेक भेट म्हणून दिला. टिळकांनी लेबर पार्टीच्या हेडर्सन, बेब आदी नेत्यांची गाठ घेतली आणि त्या नेत्यांनी भारताच्या स्वराज्याच्या मागणीस पाठिंबा देण्याचे टिळकांना आश्वासन दिले, नॉटिंगहॅम येथे भरलेल्या लेबर पार्टीच्या परिषदेमध्ये भारताच्या राजकीय हक्कांच्या मागणीस पाठिंबा देणारा ठरावही करण्यात आला. टिळकांच्या मार्गदर्शनाखाली बॅ. बॅपटिस्टा यांनी ‘सेल्फ डिटर्मिनेशन’ असे शीर्षक असलेली अत्यंत उत्तम पुस्तिका तयार केली आणि लोकमान्यांनी या पुस्तिकेच्या शेकडो प्रति इंग्लंडमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. इंग्लडमधील निवडणुकीच्या निमित्ताने टिळकांनी काही छोटी पत्रके छापून भारताची होमरूल ची मागणी मांडली आणि त्या पत्रकांच्या प्रती मतदारांमध्ये वाटल्या.

महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको याना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी , अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही.टिळकांनी त्यांच्या निवेदनात पुढीलप्रमाणे लिहिले होते, ‘ जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील.’ होमरूल डेप्युटेशन चे एक सदस्य बॅ. वेलकर यांनी पुढील आठवण सांगितली होती.टिळक वेलकाराना म्हणाले,’लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा मी प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, कि आपल्याला स्वराज्य मिळण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साहाय्य होईल.’ पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले. १९३८ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु होण्यापूर्वी पंडित नेहरू इंग्लंडमध्ये गेले होते.तेव्हा लेबर पार्टीचे काही नेते आणि पंडित नेहरू व व्ही. के.कृष्णमेनन यांच्यात बैठक २४ जूनला स्टफर्ड क्रिप्स यांच्या निवासस्थानी झाली. त्या बैठकीस लेबर व पार्टीचे मान्यवर नेते स्टॅफर्ड क्रिप्स, रिचर्ड क्रॉसमन, ataly बेव्हन आणि बारनेस हे हजर होते. प्रा.हेरॉल्ड लास्की हे ही त्यांच्या समवेत होते. लेबर पार्टीच्या नेत्यांनी २४ जून १९३६ च्या या बैठकीत नेहरूंना असे आश्वासन दिले, कि दुसऱ्या महायुद्धानंतर लेबर पार्टी जेव्हा इंग्लंडमध्ये सत्तेवर येईल, तेव्हा भारताला स्वराज्य दिले जाईल, प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धानंतर लेबर पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यावर त्या वेळचे पंतप्रधान ataly यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अशी घोषणा केली, कि भारतास स्वातंत्र्य देताना कशारीतीने सत्तांतर करावयाचे, हे निश्चित करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात पाठविले जाईल.’याशिष्टमंडळात क्रिप्स हे सदस्य होते. लोकमान्य टिळकांनी १९०७ मध्ये केर हार्डी यांचे स्वागत केले. या प्रक्रियेची परिणती लेबर पार्टीचे सरकार इंग्लंडमध्ये असताना भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.

लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन विशाल व व्यापक होता. त्यांनी रवींद्रनाथ टागोर याना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रुपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ‘मी राजकीय कार्यकर्ता नाही, मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.’ टिळकांनी त्यांना कळविले ,’तुम्ही राजकीय प्रचार करावा , अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्वाची वाटते.

संकलन:-प्रा.र.भ.वनारसे

टंकलेखन-प्रियांका कुंटे

थोरांची ओळख - भारत सेवक - गोपाळ कृष्ण गोखले (सकाळ- बालमित्र)

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील चोविसावा लेख :

सर्व सामर्थ्यानिशी देशकार्याला वाहून घेतलेल्या सेवकांची संस्था बांधणे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १९०५ मध्ये भारत सेवक समाज(सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी) या संस्थेची स्थापना केली. समाजाच्या जीवनात अंतर्बाह्य बदल घडविल्याशिवाय तो स्वातंत्र्यला पात्र होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.        

स्वातंत्र्यलढ्यात  अग्रणी असणाऱ्या काँग्रेसच्या १९०७ मधील अधिवेशनातील  ही गोष्ट. सुरत येथे डिसेंबर मध्ये हे अधिवेशन भरले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून   संघटनेत मतभेद होते. असे असतानाही डाँ.रासबिहारी घोष यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावर लोकमान्य टिळकांनी आक्षेप घेतला.अध्यक्षांनी टिळकांना बोलण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे अधिवेशनात गोंधळाचे वातावरण तयार झाले.एकदम लाठ्या काठ्यांनी हाणामारी सुरू झाली. व्यासपीठावरही   लोक धावले. लोकमान्य टिळकांच्यावर ही  एक जण धावून आला.हे पाहून नामदार गोपाळ कृष्ण गोखले मध्ये पडले आणि त्या व्यक्तीला त्यांनी रोखले.राजकारण म्हणजे दुसऱ्याचा बळी देऊन वरच्या स्थानावर पोचवण्याची धडपड सुरू असणाऱ्यांचे  क्षेत्र अश्या क्षेत्रात स्वतः कधीही कटुतेला खोटारडेपणाला आणि कट कारस्थानांना  बळी न पडता अत्यंत सभ्यतेने     अप्रिय गोष्टी देखील अत्यंत सुंदरतेने सादर करण्याचे अप्रतिम कौशल्य नामदार गोखले यांच्याकडे होते.  त्यामुळेच अत्यंत बुद्धिमान आणि समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या  व्यक्तींपैकी एक म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले.त्यामुळेच महात्मा गांधीजीनी  त्यांना आजन्म गुरुस्थानी मानले.

त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोथळूक या गावी ९ मे १८६६ रोजी झाला.त्यांचे वडील कृष्णराव गोखले कागलमध्ये (जि. कोल्हापूर) फौजदार होते.त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गोपाळचे शिक्षण कागलमध्ये झाले.नंतर मोठा भाऊ  गोविंद बरोबर ते शिकण्यासाठी कोल्हापुरात आले.ते केवळ तेरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.वडिलांचा स्वभाव बचतीचा नसल्यामुळे कुटुंबाच्या दृष्टिने हालाखीचा काळ सुरु झाला. त्यांच्या काकांनी गोविंदाला त्या काळी पंधरा रुपये पगारावर कारकून म्हणून कागलमध्ये नौकरीला लावले आणि त्याच्यावर गोपाळच्या  शिक्षणाची जबाबदारी सोपवली. गोपाळाची आई आणि बहिणीला घेऊन ते कोकणातील ताह्मणमाळ या त्यांच्या गावी गेले. पंधरा रुपयातील आठ रुपये गोविंद कोल्हापूर शिकणाऱ्या गोपळासाठी पाठवत असे.त्या काळी कोल्हापुरात महिन्याच्या जेवणाचे खानावळीचे दर साडेचार आणि चार रुपये होते.साहजिकच गोपाळने चार रुपयांचे जेवण स्वीकारले होते. चार रुपयेवाल्यांना स्वाभावीकपणे जेवणात दूध, दही न मिळता पाणी घातलेले ताक मिळत असे.पण भावाचे कष्ट आणि गरज भागावी आणि गरिबी लोकांना दिसू नये म्हणून स्वाभिमानी गोपाळने हे सर्व स्विकारले होते.पण कितीही केले तरी ते वय मोह होण्याचे होते.मित्रमंडळी समवेत जेवत असताना गोपाळने  सर्वांच्या बरोबर दही  मागून घेतले.त्यावर खाणावळीवाला खेकसला,"चार रुपडे देणार आणि दही मागून घेणार!"  हा अपमान गोपाळला सहन झाला नाही तो तेवढ्याच आवाजात गरजला " मी आज पासून साडेचारच्या दराचंच जेवणार आहे" खाणावळवाल्याचे फावलेच होते.पण गोपाळला महिन्याला वरच्या पैशाची बचत करणे आवश्यक होते. त्यासाठी मग सुटीच्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जेवणाचा खर्च चार रुपयाच्या आत राहील याची काळजी घेऊ लागला.मानीपना आणि परिस्थितीनुसार वागणे याचे धडे गोपाळाला लहानपणापासून मिळाले. गरीबीमुळे  व्यवहाराची जाणीव लहान वयातच झाल्याने अर्थशास्त्राचे बीजारोपण त्यांच्या मेंदूत तेंव्हापासूनच झाले. मॅट्रिक झाल्या नंतर प्रथम कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातुन आणि नंतर मुंबईतील एलिफस्टन महाविद्यालयातून ते गणित विषय घेऊन बी.ए. झाले.त्या काळी पदवीधर म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी हात जोडून उभी असे.स्वाभाविकपणे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कुटुंबाची इच्छा आता त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी स्विकारावी अशीच होती.कारण अत्यन्त प्रतिकूल आर्थिक  परिस्थितीत भावाने त्यांना शिकवले होते, पण ते टिळक-आगरकर यांनी सूरु केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दरमहा पस्तीस रुपये पगाराच्या नोकरीवर रुजू झाले.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणित, इंग्रजी, अर्थशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकवू लागले. वयाने लहान पण बुद्धीने तरतरीत असे मिसरूड फुटू लागलेले गोपाळराव अल्पावधीतच विद्यार्थामध्ये लोकप्रिय झाले.टिळकांच्या सांगण्यावरून ते केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करू लागले.अशा बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामात सहभाग असावा म्हणून त्यांना विनंती करण्यात आली. त्या वेळी कौटुंबिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवा,असे दोन पर्याय त्यांच्यासमोर उभे राहिले.अखेरीस १८८६मध्ये त्यांनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. त्या वेळी ते म्हणाले होते,"माझ्या घरच्या लोकांनी फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या.माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी गडगंज संपत्ती मिळावीन त्यांना सुखात ठेवीन.जेंव्हा त्यांचा आशावर पाणी शिपंडून मी माझे जीवन देशसेवेला अर्पण केले, त्या वेळी माझे बंधू तर इतके बैचेन झाली,की काही दिवस त्यांनी माझ्याशी बोलणे देखील बंद केले. पण लवकरच  माझे जीवन कार्य म्हणजे काय आहे , हे त्यांच्या लक्षात आले,ते माझ्यावर पहिल्यासारखेच  प्रेम करू लागले."                                          

१८९० मध्ये ते सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून काम करू लागले.  या संस्थेच्या त्रैमासिकाच्या संपादनाचे काम त्यांनी केले.त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उमेदवारीचा हा काळ होता.पुढे सार्वजनिक सभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आपल्या बाजूचे नवे सभासद करून घेण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. त्या वेळी झालेल्या निवडणुकीत गोखले सेक्रेटरी म्हणून निवडून आले.पण व्यवस्थापन मंडळात अन्य नवे लोक निवडून आले.त्या वेळी गोखले नी केसरीला लिहलेल्या पत्रात म्हटले की, नवीन सभासद करण्याच्या चढाओढीत आम्ही टिळकाशी कधीही बरोबरी करणार नाही.आमची राजकीय मते सारखीच आहेत.मग पक्षभेदापासून आजवर अलिप्त असलेल्या सार्वजनिक सभेत आजही दुही कशाला?" परंतु साडेसात वर्ष ज्या संस्थेत जीव ओतून काम केले ती सार्वजनिक सभा गोखले यांना सोडावी लागली.कटुतेला, खोटारडेपणाला आणि कारस्थानांना  बळी न पडता राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरता येते,हे त्यांनी दाखवून दिले.१८९८ मध्ये ते पुणे नगरपालिकेचे सरकार नियुक्त सभासद झाले.१९०२ मध्ये नगराध्यक्ष झाले.१८९९ मध्येच मुंबई विधिमंडळात आणि १९०९ मध्ये वरिष्ठ कायदेमंडळात निवडून आले.त्या काळात कोलकत्ता हे राजधानीचे शहर होते.तिथे ब्रिटिशांची इम्प्रिरियल लेजिस्लेटिव्ह कौस्निलची अधिवेशने होत.सगळे कामकाज इंग्रजीतून चालत असे.अर्थात प्रवाहीपणे इंग्रजी बोलणाऱ्या गोखले यांची भाषणे त्या वेळच्या लॉर्ड कर्झन भारावलेल्या अवस्थेत ऐकत राहत असे.त्या काळी गोखले वारंवार कोलकत्त्याला  जात.१९०१ मध्ये तिथे त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली.दोघेजण महिनाभर एकत्र होते.गोखले पूर्ण वेळ काँग्रेसचे सचिव म्हणून काम विनावेतन करत होते.काँग्रेस संघटनेतील मतभेद आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.त्यांचे कार्य व्यपक होत होते.सर्व सामर्थ्यानिशी देशकार्याला वाहून घेतलेल्या सेवकांची संस्था बांधणे हे त्यांचे स्वप्न होते.त्यासाठी १९०५ मध्ये भारत सेवक समाज(सर्व्हट्स इंडिया सोसायटी)या संस्थेची स्थापना केली.समाजाच्या जीवनात अंर्तबाह्य बदल केल्याशिवाय तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही,असे त्यांचे म्हणणे होते.त्यासाठी विधायक कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण करावे लागतील, असे त्यांचे मत आहे.                  

एखादे धार्मिक कृत्य करायचे झाल्यास ज्या चैतन्याने माणसे त्या कामासाठी पुढे सरसावतात त्याच चैतन्याने देशसेवेच्या कामासाठी तरुणांनी पुढे सरसावले पाहिजे , ही  एक आवश्यक गोष्ट आहे .सर्वांची अंतःकरणे देशप्रेमाने इतकी काठोकाठ भरली पाहिजेत, की त्याच्यापुढे सर्व गोष्टी अगदी तुच्छ तुच्छ वाटल्या पाहिजेत,असे ते नेहमी  सांगत .देशबांधणीचे काम वेगाने व्हावे यास्थिया कार्यात समर्पित वृत्तीने सहभागी होणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीची नितांत गरज असते, हे ओळखून त्यांनी अश्या पद्धतीचे शक्ती तयार करण्याचे प्रयत्न केले.त्यातूनच भारत सेवक समाजाने आदिवासासाठी कार्य केले.आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे प्रश्न यशस्वीपणे हाताळले. पूर ,दुष्काळ ,रोगराई ,भूकंप अश्या संकटांच्या प्रसंगी काम केले. स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.गोरगरिबांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सहकारी पतपेढ्या सुरु केल्या.भारत सेवक समाज संस्थेतून श्रीनिवास शास्त्री, ठक्करबाप्पा, नारायण मल्हार जोशी, गोपाळ कृष्ण देवधर, आर आर बखले, श्रीधर गणेश वझे, नरेश अप्पाजी द्रविड, वामनराव पटवर्धन असे अनेक भारत सेवक तयार झाले.प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे काम उभे केले.त्यांच्या भारत सेवेचे स्मरण होऊन कोणत्याही देशभक्ताची मान आदराने लवते. गोखले यांच्या भारत सेवक समाज संस्थेत सहभागी होऊन कार्य करावे , असे महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरु,राजेंद्र प्रसाद मोठ्या नेत्यांना वाटत होते.यातूनच संस्थेच्या आणि गोखले यांच्या कार्याचे मोठेपण स्पष्ट होते.आम्ही प्रथम भारतीय अहोतानी नंतर हिंदू, मुस्लिम,ख्रिस्ती , पारशी (असे कुणीतरी ) आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे,असे ते नेहमी सांगत.                               हे सर्व करत असताना भारताचे अनेक प्रश्न त्यांनी व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मोठ्या तडफेने मांडले. गांधीजींबरोबर ते आफ्रिकेत गेले.तेथे फिरले.प्रसंगी पायी फिरले.चटईवर झोपले.या काळात गांधीजी त्यांचा अधिक जवळ आले.पुढे गोखले यांच्या आग्रहामुळे गांधीजी कायमचे  भारतात आले आणि स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. गोखले आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते,आणि त्या काळात पाश्चात्यांच्या योग्य गोष्टीचा  आनंदाने स्वीकार करण्याची त्यांची भूमिका होती.अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे निधन वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी म्हणजे १९फेब्रुवारी १९१५ रोजी झाला.      


लेखक:- सुहास यादव.
संकलन:-प्रा.र.भ.वनारसे
हा लेख शामल विजयकुमार कुलकर्णी जि प कें प्रा शाळा गाधवड, ता.जि.-लातूर यांनी टंकीत केल्याबद्दल आभार.