रोनाल्ड रॉस
वैद्यकशास्त्रातील 1902 चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ
रोनाल्ड रॉस ज्याने मलेरिया या रोगावर संशोधन करुन त्यावरील औषध शोधून काढले असा लाखो लोकांना जीवदान देणारा शास्त्रज्ञ.रोनाल्ड रॉस याचा जन्म 23 मे 1857 साली भारतातील अलमोडा येथे झाला. पदवी परीक्षा पास झाल्यावर तो भारतीय सैन्यात दाखल झाला.त्यानंतर लंडन येथे सूक्ष्म जीवशास्त्र जंतूंचा अभ्यास करून तो भारतात परत आला. त्याकाळी प्लेगप्रमाणे मलेरिया - हिवतापाच्या साथीमध्ये थंडी वाजून ताप येऊन अशक्तपणाने अनेक रोगी दगावत असत. हे पाहून त्यांनी हिवतापवर आपले संशोधन सुरू केले. मलेरियाचे डास पाणथळ जागी निर्माण होतात. या डासांच्या शरीरात 'प्लाझमोडियम' नावाचे मलेरियाचे सूक्ष्म जंतू असतात. अनोफिलीस प्रकारच्या डासांची मादी हे जंतू प्राण्यांना दंश करतेवेळी प्राण्यांच्या शरीरात सोडते. रक्त हे डासांच्या मादीचे अन्न असल्यामुळे रक्ताच्या लाल पेशीत हे जंतू जाताच तेथे त्यांची वाढ होते. शरीरात जंतूंचा फैलाव बऱ्याच प्रमाणात झाल्यामुळे थंडी वाजून ताप येतो आणि रोगी दगावतो. हे सर्व संशोधन रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने केले. त्यानंतर त्यांनी जंतूंचा नॅश करणारे प्रभावी असे औषध शोधून काढले.त्यामुळे मलेरिया हा रोग आटोक्यात येऊन पुढील काळातही अनेकांना जीवदान मिळाले.त्यासाठी 1902 सालाचे नोबेल परितोषक रोनाल्ड रॉस यांना मिळाले.
हेन्रिक शेनक्येवव्हिच
साहित्य क्षेत्रातील 1905 सालाचे नोबेल परितोषक प्राप्त साहित्यिक
यांचा जन्म पूर्व पोलंड मधील पॉडलासे रिजन मधील व्होला ओरझैस्कार या खेडेगावात झाला .त्यावेळेस हा भाग रशियन साम्राज्यात होता.हेन्रिकला आईच्या आईचा म्हणजे आजीचा बराच सहवास लाभला त्याची आजी एक हुशार स्त्री होती.तिचे संस्कार हेन्रिक वर झाले. 1861 मध्ये हे कुटुंब वारशॉ येथे आले.तेथील शाळेत हेन्रीकचे शिक्षण सुरू झाले. हेन्रीकला इतर विषयात फारशी गती नव्हती.परंतु त्याला कलांची आवड होती.माध्यमिक शिक्षण झाल्यावर वारशॉ विद्यापीठाची वैद्यक विभागाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर कायद्याचा अभ्यास केला. त्यांचा खरा पिंड लेखकाचा होता.त्यांचं लेखन सुरूच होत. कादंबरी, लघुकथा आणि ऐतिहासिक लिखाण सुरूच होत.त्यांच्या लेखनाचा रंगतदार ओघवत्या शैलीमुळे ते लोकप्रिय लेखक बनले. १८८२ ते ८७ या काळात 'स्टोवो' या दैनिकाचे ते सहसंपादक होते.'को वाडीस?' ही रोमविषयीची नीरोच्या राजवटीवर लिहिलेली त्यांची ऐतिहासिक कांदबरी फारच गाजली. साहित्य समीक्षकांनी त्यांच्या ओघवात्या शैलीचे आणि पोलिश भाषेच्या झालेल्या पुनरुजीवनाबद्दल हेन्रीक यांनी कौतुक केले.हेन्रीक यांच्या लेखनातील वीररसात्मक शैलीबद्दल त्यांना साहित्यातील १९०५ सालचे नोबेल परितोषक देण्यात आले.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-शामल विजयकुमार कुलकर्णी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment