Sunday, December 17, 2017

नोबेल पारितोषिक

नोबेलचे मानकरी

रिचर्ड डिकिन्सन

वैद्यकशास्त्रातील १९५६ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ

     मानवी जीवनात'हृदय'हा फार महत्त्वाचा अवयव आहे.अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर हृदयविकाराचे झटके येऊन या विकाराने मृत्यू होत आहेत. अन्य स्नायूंप्रमाणे हृदयातील स्नायूंनाही सतत रक्तपुरवठा करावा लागतो. त्यात काही अडथळा निर्माण झाल्यास रक्तपुरवठा खंडीत होतो, हृदयाची क्रिया बंद होते व माणूस मृत्युमुखी पडतो.

रक्तपुरवठा कमी झाल्यास वा नियमित न झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या रक्तपुरवठ्याची क्रिया नीट होते आहे किंवा नाही हे आगाऊ समजू शकेल का??त्याचे निदान कारण समजू शकेल का?? याचा विचार रिचर्डस् डिकिन्सनच्या मनात येताच रुधिराभिसरणाच्या एकूण प्रक्रियेचे त्याने संशोधन सुरू केले. हे अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ होते.त्यांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता बाह्य रक्तवाहिन्यांतूनही त्याचा वेध घेता येतो. रोहिणी शुद्ध रक्तवाहिनी व नीला अशुद्ध रक्तवाहिनी. पायाच्या रक्तवाहिनीतून द्रवपदार्थ घेऊन जाणारी बारीक सूक्ष्मनलिका सरळ हृदयापर्यंत नेता येते व रुधिराभिसरणाचे कार्य लक्षात येऊ शकते. या संशोधनाबद्दल १९५६ चा नोबेल पुरस्कार फोर्समन व कोनार्ड यांच्याबरोबर त्यांना विभागून देण्यात आला.

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

  रोबेर्ट कॉख

वैद्यकशास्त्रातील १९०५ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ

   रोबेर्ट कॉख यांचा जन्म १२ सप्टेंबर १८४३ रोजी क्लौस्थल्य या जर्मनमुक्त गावी झाला. या जर्मन शरीरशास्त्रज्ञ (फिजिशयन) व सूक्ष्म जंतूशास्त्रज्ञाने १८८२ साली क्षय रोगासारख्या संसर्गजन्य रोगाचे जंतू शोधून काढले.त्या सूक्ष्म जंतूंना प्रतिकार करणारी प्रतिबंधक औषधेही शोधून काढली. गॉन्टिजन युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून १८६६ साली पदवी संपादन केली. १८७०-७१ फ्रान्स-प्रशिया युद्धात शस्त्रवैद्य म्हणून काम केले.

एंथ्रॅक्सवर संशोधन करून त्यांनी संरक्षक व सूक्ष्म जंतूंचे फोटोग्राफिक , सचित्र एका काचेवर पातळ सूक्ष्म जंतूंचे तरंग दाखवून त्यावर १८७७ साली प्रबंध लिहिला.साथीच्या रोगाचे सूक्ष्म जंतू वेगवेगळे संसर्गजन्य रोग पसरवतात; पण १०० वर्षांपूर्वी या जंतूंचे संशोधन करून ते कसे असतात ,कसे दिसतात हे शोधकार्य करणे फार कठीण होते ; कारण त्या काळात आजच्यासारखी सूक्ष्मदर्शक यंत्रही नव्हती. पण रोबेर्ट कॉख या जर्मन जंतूशास्त्रज्ञाने अगदी साधे सूक्ष्मदर्शक यंत्र वापरून कॉलरा , पटकी, एंथ्रॅक्स ( जनावरांचा एक रोग) यांचे सूक्ष्म रोगजंतू शोधून काढले व त्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. १९०५ सालचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना याच संशोधनाबाबत देण्यात आले.

संकलन :-  मंजिरी होनकळसे

टंकन  :-  वैशाली सरवणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment