उत्खननातील अवशेष
प्राचीन गणराज्ये, जनपदे, श्रेणी, नियम या विषयीची काहि माहिती संस्कृत वाङ्मयात आढळते. परंतु तिला पोषक अशी माहिती त्या ग्रंथकर्त्यांना नाण्यांवरूनच मिळाली आहे. भारतात निरनिराळ्या जागी उत्खनन केल्यामुळे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्यात विविध प्रकारची नाणी भिन्न भिन्न नाणी देशांच्या विविध थरात आढळली आहेत. नाण्यांवरून सर्व राजांची वंशावळ तयार करायला मदत झाली आहे.
=================================================
इतिहासाचे लेखन
सातवाहन वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या एका नाण्यावर गलबताचे चित्र आहे. यावरून त्या राजाने समुद्रावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, असे ऐतिहासिक अनुमान संशोधकांनी कलेे आहे. राजतरंगीणी हा इतिहास ग्रंथ लिहिताना कलहणाने नाण्यांच्या निरीक्षणावरूनच त्यातील काही माहिती मिळविली होती असे म्हणतात. पूर्वी भारतीय इतिहास लेखनाची प्रथा नव्हती. तरी प्राचीन काळी अनेक राज्यकर्त्यांनी ताम्रपट, शिलालेख, नाणी निर्माण करून ठेवल्यामुळे सुदैवाने पुढील काळात इतिहासाचे लेखन करताना संशोधकांना या गोष्टींवरून संदर्भ मिळवून लेखन करणे शक्य झाले.
=================================================
निकेल आणि शिसे यांची नाणी
इंडो-ग्रीक राजांनी सोन्याची नाणी न बनवता चांदीची व तांब्याचीच नाणी बनवली. पुढील काळात चांदी दुर्मिळ झाल्यामुळे इंडो-सिथींयन राजांनी चांदीची भेसळ करून बिल्लनची नाणी बनवली . इंडो-पार्थियन राजा गोंडोफरनेस याच्या वेळी शुद्ध चांदीची नाणी बंदच झाली आणि बिल्लनचा वापर होऊ लागला. कुशाण राजांनी तर चांदीची नाणी पाडलीच नाहीत. मात्र इंडो-ग्रीक राजांनी त्या काळात चांदीची नाणी न पाडता निकेल व शिसे या धातूंची नाणी पाडून ती चलनात आणली. त्यानंतरच्या काळात भारताचा रोमशी व्यापार खूपच वाढला आणि रोम येथे चलनात असलेली सोन्याची रोमन नाणी भारतात येऊ लागली. दक्षिण भारतात अशी असंख्य रोमन नाणी सापडली आहेत.
=================================================
इंडो-ग्रीक नाणी
नाणे संशोधन सुरू झाल्यावर इंडो-ग्रीक नाण्यांच्या संशोधनात खूपच प्रगती झाली. याकाळी ग्रीकांनी बरीच नाणी तयार केली होती. उत्खनन करताना तक्षशिला येथे मार्शल या संशोधकाला इंडो- ग्रीक आणि इतर राजांची बरीच नाणी सापडली. त्यावरून नाणक शास्त्रज्ञांनी या राजांविषई बरेच ज्ञान मिळविले. शक-क्षात्रपांची सुद्धा काही नाणी मिळाल्यामुळे त्यांच्या कालखंडावर बरेच संशोधन करण्यात आले. या काळात विजयनगरच्या सम्राटांच्या नाण्यांवर संशोधन होऊन त्या माहितीवर अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले. या नाण्यांवर हिंदू देवदेवतांची चित्रे विशेष करून चिन्हांकित करण्यात आलेली होती. त्यावरून त्या राजघराण्यांबद्दल त्यांच्या पूज्य देवतांची माहिती मिळण्यास मदत झाली.
=================================================
स्वतंत्र भारताची नाणी
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा १९५० पर्यंत ब्रिटिश नाणीच भारतात चलनात होती. परंतु १९५० साली प्रथम भारतीय नाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्या नाण्यांमध्ये १पै, १/२, १ आणि २ आणे तर १/४, १/२ आणि १ रुपया किमतीच्या नाण्यांचा समावेश करण्यात आला. त्या भारतीय नाण्यांना त्या वेळी आणा आणि रुपया अशा संज्ञा देण्यात आल्या. तसेच १ नया पैसा हे नाणे तयार करण्यात येऊन ते ब्राँझ या धातुमध्ये तयार केले होते. त्यानंतर २, ५ आणि १० नये पैशांची क्यूप्रोनिकेल मध्ये नाणी काढण्यात आली. तसेच २५, ५० नये पैसे आणि १ रुपयाची नाणी काढण्यात आली. ही नाणी निकेल धातूची होती.
=================================================
नाण्यांचा सुवर्ण म्हणून संग्रह
व्यापाराच्या निमित्ताने रोमन नाणी बरीच भारतात येत होती. पण ही सुवर्ण नाणी केवळ सोने म्हणून घरोघरी संग्रहित केली जात होती, असे काही संशोधकांचे मत आहे. उत्तर भारतात मात्र कुशाण राजांनी भारतात आलेल्या त्या रोमन सुवर्ण नाण्यांचे सोने वापरून स्वतःच्या नावाची १२४ ग्रेनची नवीन नाणी बनवून चलनात आणली. सातवाहन राजांनी मुख्यतः शिसे व पोटीन या धातूंची नाणी बनविली. खरं तर त्याकाळी देशात भरपूर समृद्धी होती. व्यापारही वाढलेला होता. पण तत्कालीन संपत्ती थोड्या लोकांच्याच हाती असावी. सर्वसामान्य जनता विशेष सधन नसावी. त्याकरिता पोटिन आणि शिष्याची नाणी चलनात असावीत.
=================================================
शेवटची ब्रिटिश नाणी
१९४० च्या काळातच क्यूप्रोनिकेल आणि निकेल-ब्रास या धातूंमध्ये १/२ आण्याच्या नाण्यांची निर्मिती होऊ लागली. निकेल-ब्रास या धातूचा उपयोग १ आणि २ आण्यांची नाणी तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांचे चलनातील ८० ते ९१ टक्के प्रमाण कमी करण्यात आले. ब्रिटिश निर्मित नाण्यांची शेवटची निर्मिती ही क्यूप्रोनिकेल धातुमध्ये १/४, १/२ आणि १ रुपया किमतीच्या नाण्यांमध्ये झाली असून या नाण्यांची निर्मिती १९४६ आणि १९४७ सालापर्यंत सुरू होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आली. पण तरीही भारतात १९५० पर्यंत ही नाणी चलनात होती.
=================================================
भारतीय चलनाचा कोड नंबर
इ.स.१९५० नंतर स्वतंत्र भारताची नाणी तयार होऊ लागली. या भारतीय चलनाला रुपया आणि सुट्टे रुपये म्हणजे पैसे अशा संज्ञा देण्यात आल्या. हि नावे भारतभर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचे चलन म्हणून अधिकृत स्वरूपात वापरात येऊ लागली. परंतु प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन असल्यामुळे प्रत्येक देशाच्या चलनाला एक आंतरराष्ट्रीय कोड देण्यात आला. भारतीय चलनाचा कोड INR हा आहे. तसेच जगातील प्रत्येक चलनाला ISO नं देण्यात येतो. भारतीय चलनाचा ISO नं ४२१७ हा आहे. तसेच प्रत्येक चलनासाठी एक चिन्ह वापरायची पद्धत आहे. भारतीय रुपयासाठी Rs. हे चिन्ह वापरात येते.
=================================================
भारतात ब्रिटिश नाण्यांची सुरुवात
इंग्रजांनी संपूर्ण भारतावर सत्ता काबीज करण्यापूर्वी भारतातील विविध राज्यातील दिड-दोनशे नाण्यांचा मेळ घालणे सरकारी खाजिनदारांना त्रासदायक होऊ लागले. म्हणून इ स १८३५ पासून इंग्रजांनी आपली स्वतंत्र शैलीची नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्यावर एका बाजूला चौथ्या विल्यम्सचा मुखवटा आणि दुसऱ्या बाजूला वाघाची आकृती असे. हि नाणी काढल्यावर बाकी सर्व नाणी बंद करण्यात आली. त्याकाळी भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली तीन मुख्यालये स्थापन केली होती. बंगाल, मुंबई व मद्रास येथे त्यांची कार्यालये होती. या तीनही ब्रिटिश कार्यालयानी आपापले वेगवेगळे चलन काढले होते.
=================================================
स्वतंत्र भारताची नाणी
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा १९५० पर्यंत ब्रिटिश नाणीच भारतात चलनात होती. परंतु १९५० साली प्रथम भारतीय नाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्या नाण्यांमध्ये १पै, १/२, १ आणि २ आणे तर १/४, १/२ आणि १ रुपया किमतीच्या नाण्यांचा समावेश करण्यात आला. त्या भारतीय नाण्यांना त्या वेळी आणा आणि रुपया अशा संज्ञा देण्यात आल्या. तसेच १ नया पैसा हे नाणे तयार करण्यात येऊन ते ब्राँझ या धातुमध्ये तयार केले होते. त्यानंतर २, ५ आणि १० नये पैशांची क्यूप्रोनिकेल मध्ये नाणी काढण्यात आली. तसेच २५, ५० नये पैसे आणि १ रुपयाची नाणी काढण्यात आली. ही नाणी निकेल धातूची होती.
=================================================
शेवटची ब्रिटिश नाणी
१९४० च्या काळातच क्यूप्रोनिकेल आणि निकेल-ब्रास या धातूंमध्ये १/२ आण्याच्या नाण्यांची निर्मिती होऊ लागली. निकेल-ब्रास या धातूचा उपयोग १ आणि २ आण्यांची नाणी तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांचे चलनातील ८० ते ९१ टक्के प्रमाण कमी करण्यात आले. ब्रिटिश निर्मित नाण्यांची शेवटची निर्मिती ही क्यूप्रोनिकेल धातुमध्ये १/४, १/२ आणि १ रुपया किमतीच्या नाण्यांमध्ये झाली असून या नाण्यांची निर्मिती १९४६ आणि १९४७ सालापर्यंत सुरू होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आली. पण तरीही भारतात १९५० पर्यंत ही नाणी चलनात होती.
================================================
१०० पैसे=१रुपया
भारतीय चलनात रुपया ही संज्ञा निश्चित झाल्यानंतर त्या रुपयाची किंमत ठरविण्यात आली. त्यासाठी १०० पैसे म्हणजे १रुपया ही रुपयाची किंमत निश्चित करण्यात आली. रुपयाच्या सुट्ट्या पैशांसाठी २५पैसे व ५० पैसे अशी नाणी काढण्यात आली. त्यातही सुरुवातीला सुट्ट्या पैशांमध्ये १ पैसा, २ पैसे, ५ पैसे, १० पैसे आणि २० पैशांच्या सुट्ट्या नाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्याकाळी १ पैसा ते २० , ५० पैशांच्या नाण्यांना व्यवहारात बरेच मोल होते. त्यामुळे रोजच्या व्यवहारात या सुट्ट्या नाण्यांचा खूप वापर होत असे. म्हणून शेवटची ब्रिटिश नाणी
१९४० च्या काळातच क्यूप्रोनिकेल आणि निकेल-ब्रास या धातूंमध्ये १/२ आण्याच्या नाण्यांची निर्मिती होऊ लागली. निकेल-ब्रास या धातूचा उपयोग १ आणि २ आण्यांची नाणी तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांचे चलनातील ८० ते ९१ टक्के प्रमाण कमी करण्यात आले. ब्रिटिश निर्मित नाण्यांची शेवटची निर्मिती ही क्यूप्रोनिकेल धातुमध्ये १/४, १/२ आणि १ रुपया किमतीच्या नाण्यांमध्ये झाली असून या नाण्यांची निर्मिती १९४६ आणि १९४७ सालापर्यंत सुरू होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आली. पण तरीही भारतात १९५० पर्यंत ही नाणी चलनात होती. नाण्यांची निर्मिती सुद्धा बऱ्याच प्रमाणात करण्यात आली होती. ही नाणी बहुतेक निकेल या धातूची होती.
=================================================
चलनाचा अधिकार
स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० सालानंतर निघालेल्या या नाण्यांचा किंवा भारतीय चलनाचा संपूर्ण अधिकार तेव्हा पासून ते आजपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आलेला आहे. पुढे या नाण्यांच्या किमतीच्या कागदी नोटा चलनात आणण्याचा जागतिक निर्णय झाला. या नोटांच्या निर्मितीचा इतिहास रंजक असाच आहे. भारतात १ रुपया किमतीच्या नोटेपासून १००० रुपये किमतीपर्यंत नोटांची निर्मिती होते. त्यात २ रुपये , ५ रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, ५०० रुपये आणि१००० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. १ रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची तर पुढील सर्व प्रकारच्या किमतींच्या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांची मान्यतादर्शक स्वाक्षरी असते.
=================================================
ईस्ट इंडिया कंपनीची नाणी
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे चलन काढले त्यावेळेस तांबे या धातूची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयातून ब्रिटिशांच्या नावे परंतु वेगवेगळ्या किंमतीची नाणी काढण्यात आली. बंगाल विभागात १ आणि अर्धा पै ; आणि १ आणि पाव; अर्धा, एक, दोन,चार पैशांची नाणी तयार केली गेली तर मद्रास कार्यालयातून २, ४ पै, १,२ आणि चार पैसे अशी नाणी तयार करण्यात आली. त्याची किंमत १/९६ व १/४८ रुपया अशी होती. मद्रास कार्यालयातून फनम हे चलनही चलनात होतं.
=================================================
आणा, रुपया, मोहर
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल, मुंबई, आणि मद्रास येथील तिन्ही कार्यालयांनी सोन्याच्या मोहरा काढण्यास सुरुवात केली. तीनही कार्यालयांनी वेगवेगळ्या किमतीच्या सोन्याच्या मोहरा काढल्या. बंगाल कार्यालयाने १/१६, १/४, १/२ अशा किमतीच्या सोन्याच्या मोहरा काढल्या. तर मुंबई कार्यालयाने १/१५ किंमतीचा सोन्याचा रुपया काढला. १/४ आणि १/२ किंमतीची मोहर मद्रास कार्यालयाने तयार करून हे सर्व चलन चलनात आणले. १९३५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने तांब्याची नाणी, चांदीची नाणी आणि सुवर्णाची नाणी चलनात आणली. त्याला अनुक्रमे आणा, रुपया, आणि मोहर अशी नावे देण्यात आली.
=================================================
नाणी म्हणजे फक्त गुप्तधन
काही वेळेस पूर्वीच्या जुन्या किल्ल्यातून किंवा जुन्या वाड्यांतून पूर्वीच्या काळी पुरून ठेवलेले धनाचे साठे सापडतात. हे गुप्तधन सुवर्ण किंवा चांदीच्या स्वरूपात मिळण्याची शक्यता असते. त्या काळातील सुवर्ण नाण्यांची किंमत आज हजाराच्या पटीत असल्यामुळे ज्या पुढील पिढ्याना हे धन सापडते, त्यांना ती सोन्या चांदीची जुनी नाणी वितळवून किंवा विकून त्या नाण्यांपासून धन मिळविता येते. धन हे माणसाला मोहित करणारे असल्यामुळे त्या नाण्यांवरील चिन्हे, अक्षरे किंवा काळ या दुर्बोध गोष्टींचा विचार न करता त्यातून पैसा उभा केला जातो. अशा वेळेस बरेच ऐतिहासिक पुरावे पुसले जातात. आधीच इतिहासाचे फारच थोडे पुरावे उपलब्ध असताना अशी पुरातन नाणी अभ्यासासाठी मिळाली तर इतिहासातील बऱ्याच लुप्त गोष्टींचे ज्ञान या नाण्यांमुळे मिळू शकेल.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-प्रियांका कुंटे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग
No comments:
Post a Comment