८ मे २००० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या शिलान्यासाला ५० वर्षे पूर्ण होतात. इ.स.१०/०१/२०२६ रोजी गझनीच्या महम्मूदाने सोमनाथवर प्रथम हल्ला केला, त्यावेळी गुजरातमधील प्रभासपट्टण हे भरभराटीला आलेले आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बंदर होते. प्रत्यक्ष सोमनाथ मंदिरातील अगणित संपत्ती पाहून गझनीच्या महमूदाचे डोळे दिपले.त्याचे भले मोठे स्तंभ झगमगीत रत्नांनी आणि हिरे-माणकांनी मढविलेले होते. मूर्तीभोवतालचा साखळदंड हा, काही मण सोन्याचा बनविलेला होता.महमूदाचे ती संपत्ती तर लुटलीच परंतु शिवमूर्तीवर घणाचे घाव घालून तीही त्याने फोडून टाकली आणि ते भव्य मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.पण हे सहजासहजी करणे त्याला शक्य झाले नाही. सौराष्ट्राच्या हिंदू सेनेने त्याच्याशी घनघोर संग्राम केला. त्यात ५०००० हिंदू वीर धारातिर्थी पडले, असे इतिहास सांगतो.लूटमार करून गझनीचा महमूद गेल्यानंतर पुन्हा मंदिर उभारण्यात आले. पण थोड्याच काळात इतिहासाची पुनरावृत्ती झाली. चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने सोमनाथवर हल्ला चढविला.लुटालूट केली आणि शिवमंदिर पुन्हा जमीनदोस्त केले. हिंदूंनी ते पुन्हा बांधले. त्यानंतर शिवशाही नष्ट करण्याकरिता सतराव्या शतकाच्या अखेरीला औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्यावेळी त्याने आपली वक्रदृष्टी प्रभासपट्टणच्या सोमनाथ मंदिराकडे वळवली.त्याने तेथे मशीद बांधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो मराठ्यांच्या प्रखर विरोधामुळे यशस्वी झाला नाही. तिथे पुन्हा मंदिर उभारण्यात हिंदूंची हिंदूंनी यश मिळविले. इ.स.१७८३ च्या सुमारास इंदूरच्या राणीसाहेब अहिल्याबाई होळकर यांनी जुन्या मंदिराच्या जागेपासून दूर अंतरावर नवे शिवमंदिर बांधले. संरक्षणास सोपे जावे म्हणून त्यांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापनाही भुयारात करून घेतली.नंतर १९ व्या शतकात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत मूळ मंदिराची पडझड तशीच राहिली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला पुन्हा आरंभ झाला.
सोमनाथ व अयोध्येतील श्रीरामाचे प्राचीन मंदिर या दोघांच्याही इतिहासात विलक्षण साम्य आहे. दोन संस्कृतींतील संघर्षाची ती प्रतीके बनली आहेत. प्रख्यात पाश्चात्य लेखक हटिग्टन यांनी आपल्या 'क्लॅश ऑफ कल्चर्स' या पुस्तकात जे प्रमेय मांडले आहे. त्याचा प्रत्यय या दोन्ही मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आल्याशिवाय राहत नाही.
१९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिराच्या पुनरूभारणीचा प्रश्न कसा हाताळला तो इतिहास मोठा स्फूर्तीदायक आहे. बॅ.मुन्शी त्यावेळचे बांधकाममंत्री.न.वि.गाडगीळ यांनीही त्या संबंधात बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. खुद्द मुन्शीनींच लिहिलेल्या 'सोमनाथ, दी श्राईन इटर्नल' या पुस्तकात त्याबाबतचा साद्यंत इतिहास वाचायला मिळतो. त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, 'स्वातंत्र्यपूर्व काळात जेंव्हा जेव्हा जेव्हा हिंदूंनी मंदिराची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न केले तेव्हा तेव्हा हिंदू -मुस्लिम दंगे झाले'.आपण काॅलेजात असल्यापासून सोमनाथ मंदिराची भग्नावस्था पाहून कसे अस्वस्थ होतो त्याचा उल्लेखही त्यांनी त्यात केला आहे, '१९२२ च्या डिसेंबर महिन्यात एका भल्या पहाटे ते भग्न मंदिर पाहण्यास मी गेलो होतो.त्याची दुर्दशा पाहून मला रडू कोसळले. त्याच्या वैभवसंपन्न काळाचे दिवस मला आठवले आणि मी बेचैन झालो.ज्या मंदिराच्या गूढमंडपात एकेकाळी सौराष्ट्रातील अत्यंत पराक्रमी, बलाढ्य आणि उत्तुंग व्यक्तीचा मोठ्या दिमाखाने वावर व्हायचा,त्याच जागी एक यःकश्चित कोतवालाने आपले घोडे बांधलेले बघून माझे मन विषण्ण होऊन गेले.' त्यांनी पुढे याच विषयावर 'जय सोमनाथ' या नावाची एक कादंबरी लिहिली.त्यांची ही कादंबरी गुजराथच्या हिंदू समाजाचे मानस घडण्यास कारणीभूत ठरली.यासंबंधात ते म्हणतात, 'सोमनाथ मंदिराची वैभवशाली व आलिशान पुनरूभारणी ही एक राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे (नॅशनल प्लेज).स्मारक या स्वरुपात ते भग्न अवशेष केवळ शाबूत ठेवणे हा त्याचा उद्देश असू शकत नाही. "
दुसरी एक आठवण सांगताना ते लिहितात, 'तो दिवस होता १२ नोव्हेंबर १९४७. त्या दिवशी दीपावली होती. मी, काकासाहेब गाडगीळ व सरदार पटेल मूळ सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला गेलो होतो.सरदारांच्या बरोबर संथपणे समुद्रकिना-यावर चालत होतो.एका विचाराने माझ्या मनात उसळी मारली. त्याच आवेगात मी सरदारांना म्हटले, भारत सरकारने भव्य सोमनाथ मंदिर नव्याने बांधले पाहिजे. कदाचित त्यांच्याही मनात तेच विचार चालू असले पाहिजेत.एका क्षणाचाही विलंब न लावता ते तात्काळ म्हणाले, गो अहेड! करा सुरूवात! थांबलात कशाला?'
सरदार पटेल व बॅ.मुन्शी यांचे राष्ट्रीय प्रश्नावरील विचार कसे मिळतेजुळते होते त्याबाबतीतील एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे. त्याच मुक्कामात पुरातत्व खात्याचे काही अधिकारी सरदारांना भेटले. त्यांनी आग्रह धरला की नवीन मंदिर बांधण्याऐवजी आपण मंदिराचा जीर्णोद्धार करू, म्हणजे एक स्मारक म्हणून त्याची बूज राखली जाईल. पटेलांनी त्यांचे हे म्हणणे तात्काळ धुडकावून लावले. ते म्हणाले, या मंदिराच्या बाबतीत हिंदू समाजाच्या भावना एवढ्या तीव्र, प्रखर आणि सार्वत्रिक आहेत की त्याचा केवळ जीर्णोद्धार करून त्याची डागडुजी करून त्यांचे मुळीच समाधान होणार नाही. कारण तो हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा आणि इभ्रतीचा प्रश्न आहे, म्हणून नव्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना होणे आणि भव्य सोमनाथ बाबतीत धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाने बराच हलकल्लोळ माजविला आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनीदेखील हा मुद्दा सोमनाथ मंदिराबाबत प्रकर्षाने मांडला होता.त्याचीच चर्चा मंत्रीमंडळाच्या एका बैठकीत निघाली.मंदिराच्या पुनरुभारणीचा प्रश्न हा जातीय स्वरूपाचा आहे, असे नेहरू म्हणाले. त्यांच्या प्रतिपादनावर बॅ.मुन्शींनी स्पष्ट शब्दात आक्षेप घेतला, म्हणून ती चर्चा तिथेच थांबली.पण मुन्शी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी पंडित नेहरूंना पत्र पाठविले. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले की, "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदूंचे अधिदैवत असलेल्या भगवान शिवशंकराचे मंदिर नव्याने उभारण्याचे त्यांना जर स्वातंत्र्य नसेल तर अशा स्वातंत्र्याला त्यांच्या लेखी अर्थ तरी काय राहतो? माझ्या त्याबाबतीतील मतांना आपण जातीय म्हणून समजत असाल तर आपल्या मंत्रीमंडळात न राहणेच मी पसंत करीन." अर्थात पंडित नेहरूंनी हा प्रश्न अधिक ताणून धरला नाही. कदाचित ते त्यावर अल्पमतात असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. पुढे सोमनाथ मंदिर पूर्ण झाल्यावर शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा प्रसंग आला. तो दिवस होता 11/5/1951. त्यावेळी राजेन्द्र प्रसाद राष्ट्रपती होते. प्राणप्रतिष्ठापना त्यांच्याच हस्ते व्हावी, असे ठरले. त्यांनी या प्रस्तावाला मान्यताही दिली व तसे जाहीरही करून टाकले. परंतु पंडित नेहरूंना हे पसंत नव्हते. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व्हावी,ही गोष्ट त्यांच्या नाजूक व हळव्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला तडा देणारी वाटली.पण राजेन्द्र प्रसादांना तसे वाटत नव्हते. त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना स्पष्टच कळविले की,मी एक हिंदू आहे आणि राष्ट्रपती म्हणून नव्हे तर केवळ एक व्यक्ती म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हा मी माझा सन्मान समजतो. त्यात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला येते असे मला मुळीच वाटत नाही. तथापि आपला जर असा ग्रह असेल तर मी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देईन. पण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही. राजेन्द्र प्रसादांनी अशी निर्वाणीची भुमिका घेतल्यानंतर पंडितजींना माघार घेण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नाही.
सोमनाथ मंदिर काय किंवा रामजन्मभूमीचा प्रश्न काय या दोन्ही प्रश्नाबाबतीत इस्लाम मनोवृत्तीचे दर्शन त्याच स्वरुपात घडले आहे याचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. थोर समाजवादी नेते कै.मधु लिमये 'आसाम ट्रिब्युन'च्या 16/7/1993 च्या अंकात (सोमनाथ अॅड अयोध्या:ए कंपेरिजन)लिहितात-सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिर पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजे मूळ देवालयाच्या जागेवर नव्याने उभारण्याचा प्रश्न हाती घेतला, तेव्हा पंडित नेहरूंच्या मुस्लिम मित्रांनी त्या विरुद्ध बराच गहजब केला. परंतु जामानिमा मशीद (जुनी दिल्ली) दुरूस्त करण्यासाठी केंद्रसरकारने जेव्हा आर्थिक मदत जाहीर केली, तेव्हा त्यांचा हा विरोध मावळला.याबाबतीत त्यावेळचे बांधकाममंत्री न.वि.गाडगीळ यांनीही आपल्या 'पथिक' या पूस्तकात अब्दुल कलाम आझादांच्या तत्संबंधीच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. आझाद म्हणाले,"मंदिर बांधावयाचे असेल तर खुशाल बांधा,पण त्याच जागी का?दुसरीकडे कुठेतरी बांधा." अर्थात त्यांची ही सूचना गाडगीळ व सरदार पटेलांनी धुडकावून लावली हे निराळे सांगण्याची गरज नाही. पण या तथाकथित राष्ट्रीय मुस्लिम नेत्यांची भूमिकाही कशी छुपी जातीयवादी होती हेच दिसून येते नाही काय?
सोमनाथ मंदिराबाबतची मुस्लिम मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आणखी एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे. विशेष म्हणजे त्याचा संबंध साक्षात महात्मा गांधींशींच पोचतो.त्याबाबत रफिक झकेरिया यांनी 'सरदार पटेल अॅण्ड इंडियन मुस्लिम्स' या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.ते असे -काही बहकलेल्या मुस्लिमांनी सरदार पटेलांच्या सोमनाथ मंदिराच्या नवनिर्मितीलि प्रखर आक्षेप घेतला. त्यापैकी एकाने तर एका प्रख्यात उर्दू पत्रिकेत हिंदू समाजाची व भारताची निर्भत्सना करणारा एक शेरच प्रसिद्ध केला, 'फिर बनायला जा रहा है सोमनाथ! एक नया मुहमद आनेको है!' सुदैवाने बर्याच सुजाण मुस्लिमांनी त्याबद्दल नाराजी प्रदर्शित केली.सरदार पटेलांच्या वाचनात ही शेरोशायरी आल्याबरोबर त्यांनी महात्माजींचे त्याकडे लक्ष वेधले. १२/१२/१९४७ रोजी झालेल्या त्यांच्या प्रार्थनासभेत महात्माजींनी त्याचा उल्लेख केला व ते म्हणाले की, हा शेर वाचून मला फारच क्लेश व दुःख झाले. भारतातील कोणताही सच्चा मुसलमान असे विचार मनात तरी आणू शकतो काय? इथल्या मुसलमानांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी सहकार्य का देऊ नये व त्याबद्दल त्यांना अभिमान का वाटू नये? महमूद गझनवीने जी हीन, रानटी आणि असंस्कृत कृत्ये केली त्याबद्दल इथल्या मुसलमानांना अभिमान वाटतो काय? तसे असेल तर ते दुर्दैव आहे. कारण अपकृत्याची फेड सत्कृत्याने करावी, हे ब्रीद मी स्वीकारले आहे, म्हणून माझ्या मुस्लिम बांधवांना माझे असे म्हणणे आहे की, त्यांनी व शिखांनी या भावनेच्या आहारी न जाता कोणाच्याही बहकाव्याच्या सापळ्यात स्वतःला अडकून घेऊ नये. एखाद्या फालतू उर्दू पत्रात ही बातमी आली असती तर त्याची मी दखल घेतली नसती. परंतु हा शेर एका प्रतिष्ठित उर्दू पत्रात छापून आला, म्हणून त्यावर माझी प्रतिक्रिया सांगणे मला आवश्यक वाटते.
(दिल्ली डायरी :गांधीजीज प्रेअर स्पीचेस, १/९/१९४७ ते १/९/१९४८)
कदाचित गांधी आज हयात असते तर तोच अनुभव त्यांना आला असता.
(विश्व संवाद फीचर्स)
----गो.ब.सरदेसाई

No comments:
Post a Comment