१६५८ चं ते वर्ष देशभरात मराठे,मोगल आणि आदिलशाही राजवटीतील तो युद्धाचा काळ.अली आदिलशहा( द्वितीय)यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाडाव कारण्याचा विडा उचलला होता.त्यासाठी आपला सेनापती अफ़जल खान याला त्याने निवडले होते.शकुन-अपशकुन मानणारा अफ़जल खान याने लढाईला जाण्यापूर्वी एका ज्योतिषाची भेट घेतली तेव्हांच त्याच्या मृत्युचे निदान झाले होते."या मोहिमेत तू ठार झाल्यानंतर तुझ्या सर्व राण्या दुसर्यांशी विवाह करतील",असे हि ज्योतिषाने सांगितले.अर्थात आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना मिळाल्याने खान खूप व्यथित झाला.पण त्याला जास्त दुःख झाले ते आपल्या पत्नींच्या संभाव्य दुसऱ्या लग्नांचे अफ़जल खानाचे आपल्या पत्नींवर इतके प्रम होते की त्यांनी आपल्या नंतर इतर कोणाशीही विवाह करावा, हि कल्पना हि त्याला सहन झाली नाही.तेव्हा त्याने आपल्या पत्नींची हत्या करण्याचा निर्णय घेतला.त्याचा पत्नी किती होत्या माहित्येय? एकूण ६३ .छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला जाण्यापूर्वी त्याने या ६३ जणींना ठार केले. या क्रूर प्रेमाच्या आठवणी अजूनही विजापूर येथे जपून ठेवण्यात आल्या आहेत.'साठ कबर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात एक एकर जमीनी वर या दुर्दैवी महिलांच्या कबरी आहेत.त्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर अफ़जल खान ह्याची कबर आहे.अर्थात ही सर्व सोय त्याने शिवाजी महाराजानं विरुध्द मोहिमेला जाण्यापूर्वीच करून ठेवली होती.
भारतीय पुरातत्व विभागाने हे स्थळ ताब्यात घेऊन जतन करण्याचा निर्णय घेतला.मात्र असे असूनही त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे.कर्नाटक सरकारने राज्यातील पर्यटनास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या तऱ्हेने त्यांची वाटचाल सुरु आहे,त्यातून ते पर्यटना बाबत किती उदासीन आहेत हे दिसून येते. साठ कबर जाणारा पक्का रास्ता ही उपलब्ध नाहीं.जो आहे त्याची अवस्था खूप वाईट आहे. संपूर्ण विजापूरमध्ये प्रसिद्ध गोल घुमट सह एकूण ५० मशीदी आणि 20 ऐतिहासिक कबरी आहेत. मात्र पुरातत्व खात्याकडे त्यांची व्यवस्था पाहायला पुरेसा निधी नाही असे आता स्पष्ठ होत आहे.त्यात सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च वगळल्यानंतर प्रत्येक पुरातन स्थळाचे जातं करण्यासाठी अवघे ७६०० रुपये मिळतात. विभागातील काहींचे असे हि म्हणणे आहे की साठ कबरह्या कबरीच आहेत नाव , मग त्यावर खर्च करून काय करणार. पण शेवटी ताजमहाल हि हि एक कबरच आहे ना?मुळात ह्या पत्थरांकडे एक इतिहास मगणून पहिलं तर ते खूप विचित्र वाटते. अफ़जल खानाचे अपल्या पत्नींवर खूप प्रेम होत हे खरं असलं तरी त्याच्या क्रूरपणामुळे त्यांना मिळालेला अकाली मृत्यु हा हि इतिहासाचा भाग नाही होऊ शकत का?
संकलन:-प्रा.र.भ.वनारसे
श्री. दीपक सरनोबत यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.
#जुनेमराठीलेख

No comments:
Post a Comment