Saturday, January 14, 2017

घोरपडे घाट आणि इतिहास

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील सोळावा लेख :

घोरपडे घाटाविषयीचे ल.ग.दिनकर यांचे पत्र वाचले. पत्राचा आशय चांगला आहे. घोरपडे घाटाच्या जीर्णोदारावाषयी गेल्याच वर्षी विजय काळे, विवेक शिंदे, नागपाल, सुरेश शिंदे, संजय गोडबोले, पाथ. ना. बलकवडे, मौरारराव चव्हाण, सौ. भार्गवी चव्हाण व माजी महापौर वंदना चव्हाण अशा सर्वांनी घोरपडे घाटावर सभा घेतली. पुणे महापालिकेचे स्थापत्य व आरोग्य विभागाचे अधिकारी त्या वेळी उपस्थित होते. महापालिकेने माझ्या विनंतीवरून व वंदना चव्हाण यांच्या आग्रहावरून घोरपडे घाटावर सफाई कामासाठी कामगारही नेमले होते. पुणे तहसील कार्यालयतील मिळकतीच्या उता-यात सिटी सर्व्हे क्रमांकासहित एक नकाशात ऐतिहासिक घोरपडे घाटावरील स्मारक छत्र्यासहित छापला आहे. घोरपडे घराण्यातील विश्वासराव संताजीराव घोरपडे, आनंदराव संताजीराव घोरपडे व सौ. गायकवाड अशी ( इ.स. १८२० च्या ) सरदार यशवंत राव यांच्या वंशजांनची नावे आहेत. आजमितीस कै. आनंदराव घोरपडे यांच्या कन्या सौ. भार्गवी चव्हाण    ( पूर्वाश्रमीच्या कु. राजनंदा आनंदराव घोरपडे)   या माजी महापौर वंदना चव्हाण यांच्या जाऊबाई असून, त्यांचे यशवंतराव घोरपडे यांचे सध्याचे वंशज पुढील प्रमाणे आहेत. श्री. कर्णसिंह दौलतराव घोरपडे ( कै. विश्वासरावांचे नातू), दत्तवाड हाऊस , कोल्हापूर ; कु. रत्नमाला घोरपडे , पुणे; श्री. प्रतापसिंह घोरपडे, कोल्हापूर;  सौ.वैजयंती माला दौलतराव घोरपडे;आनंदराव कर्णसिंह यांची बहिण संगीता गायकवाड.                    

म्हळोजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कार्यरत होते. त्यांना पन्हाळगडावर संभाजी महाराजांनसमवेत वास्तव्याठी व सुरक्षेसाठी शिवाजीराजांनी आदेश देऊन ठेवले होते. म्ळोजी घोरपडे यांना संभाजी महाराजांच्या आधीच औरंगजेबाकडून मारण्यात आले. त्यांची नावे तीन होती. ज्येष्ठ पौत्र इतिहास प्रसिद्ध संताजी घोरपडे, द्वितीत पुत्र बहिर्जी घोरपडे व तृतीय पुत्र मालोजी घोरपडे. हे तिन्ही व शिवाय विठोजी चव्हाण यांनी संयाजीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या छावणीत घुसंन बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस काढून आणंन छत्रपती राजारामांनकडे सादर केला होता. संभाजीच्या हत्येनंतरची ही एक विशेष घटना होती. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीस कापशी व इतर ठिकाणची जहागिरी दिली. बर्हिजी यास 'हिंदुराव' हा किताब देऊन सोंडुखगुत्ती अशी ठिकाणे सरंजामाने दिली. मालोजी याअंस 'अमीर उल उमराव' किताब देऊन करवीर प्रांतातील दत्तवाडची सनद दिली. मालोजी घोरपडे यांच्यानंतर त्यांच्या घराण्यास दत्तवाडकर घोरपडे 'र उल उमराव'  असे ऐतिहासिक नावाने संबोधले जाते. वाठोजी चव्हाणांना 'हिंमत     बहाद्दूर'  हा किताब छत्रपती राजारामांनी दिला. त्यांच्या वंशजापैकी अॅड . हेमंत चव्हाण, मुरारराव चव्हाण , पुणे येथे आहेत. घोरपडे घाटाच्या आजमितीच्या मिळकतीच्या कागदपत्रावर वर नमूद केल्याप्रमाणे विश्वासराव संताजीराव घोरपडे व आनंदराव संताजीराव घोरपडे याअंची नावे आहेत. सौ भार्गवी चव्हाण व कर्णसिंह घोरपडे यांस कागदपत्र जाहीर करण्यासाठी, वारसाहक्काची नोंद करण्यासाठी त्यांच्या अर्जावून तहसील कार्यालयाने बोलावले आहे. घोरपडे घाटाच्या सुधारणेसाठी आम्ही एका जीर्णोद्धार समितीची स्थापना केली आहे.  घोरपडे घाट व परिसराची जमीन एकूण आठ एकर एकवीस गुंठे आहे. ऐतिहासिक कागदपत्रांत 'कळकीचा बाग' म्हणून ती नोंदविलेली आहे. ब्रिटिशानी १८२० मध्ये यशवंतराव घोरपडेंच्या निधनानंतर तांच्या पुत्राच्या नावे करून दिली होती. सावत्र भावंडे निपुत्रिक असल्याने औरस पुत्रास कळकीच्या बागेतील यशवंतराव घोरपडे, त्यांच्या पत्नी व इतर अशा तीन स्मारक छत्र्या असल्याबद्दल पूर्वीचा उल्लेख आहे. अहल्याबाईंनी बांधलेल्या घाटाशी संबंधीत असलेल्या कारागिरांच्या परंपरेतिल कामगार एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वाधात पूण्यात पाचारण केले असावेत. परंतू अहल्याबाईंनी बांधलेला हा घाट नव्हे . या घाटाचे स्वरूप निश्चितच वाखाण्यासारखे आहे. या घाटास लेगून नदीच्या प्रवाहात छोट्या बोटी वापरून नौका विहार करण्याचा महापालिकेचा बेत होता. तो रद्द झाला.              


लेखक - प्र. ज. तावडे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ. विदुला सौरभ थोरातयांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.



No comments:

Post a Comment