मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील अठरावा लेख : पेशव्यांची घड्याळे !
भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर अनेक आधुनिक वस्तू-उपकरणांचा आपणांस परिचय झाला. इंग्रजांनी भेट म्हणून दिलेल्या कात्री, चाकू, होकायंत्र, दुर्बीण अशा साध्या वस्तूंचेही इथल्या राजे सरदारांना मोठे अप्रूप वाटे. त्या वेळी घड्याळ हा अतिशय अमूल्य नजराणा मानला जाई. इंग्रज वकिलाने जहाँगीर बादशहाला घड्याळाचा नजराणा दिला होता. पेशव्यांनाही प्रारंभी इंग्रजांनी घड्याळे भेट म्हणून दिली होती. या घड्याळांची पेशव्यांना मोठी आवड होती. पहिला बाजीराव पेशवा घड्याळ वापरत असल्याच्या नोंदी आहेत. थोरले माधवराव व नारायणराव हे दोन्ही तर घड्याळांचे मोठे शौकीन होते. त्यावेळी घड्याळे प्रचंड महाग होती. नारायणरावांचे घड्याळ तर अतिशय दुर्मिळ व महागडे होते. या मनगटी घड्याळांची ते फारच काळजी घेत व अगदी महत्त्वाच्या प्रसंगीच ते वापरत. त्याला ठेवायला अतिशय सुंदर मखमलीची डबी होती. एखाद्या गजऱ्याप्रमाणे ते हाताला घड्याळ बांधत व त्याला चमेलीचे अत्तर लावीत! पेशव्यांकडे एक घड्याळ तर एक हजार ६९१ रुपयांचे होते (त्यावेळी कारकुनांचा पगार ५-६ रुपये होता!) थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाला भेट म्हणून दिलेले घड्याळ तर फारच वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यातून संगीताचे विविध राग अतिशय सुमधूर आवाजात ऐकू येत. त्याची किंमत होती पाच हजार रुपये.
लेखक - हेमराज बागुल
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. अमोल शिंपी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.

No comments:
Post a Comment