मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील विसावा लेख : विषपरीक्षा घेणारी भांडी
मानवी संस्कृतीत ‘भांडी संस्कृती’ हा एक अभ्यासाचा विषय आहे.इसवीसनपूर्व १२०० मधील ताम्रपाषाण युगांपासून झालेले विविध कालखंडातील , विविध प्रदेशातील, विविध प्रकारातील व विविध गरजांनुसार बनविलेली भांडी त्या त्या काळाचे निदर्शक असल्याचे पुरातत्वज्ञ मानतात. मातीची भांडी आजही आपणांस कधी न कधी वापरावी लागतात, पण तांबे, पितळ,लाकूड, दगड, कातड्याची अशी कितीतरी प्रकारची भांडी विविध आकारात वापरली जात.सोने-चांदी गेले, पितळ आले, पितळ गेले आणि जर्मन व स्टेनलेस स्टील आले आणि आता तर प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आपण पाहत आहोत.
आपापल्या गरजेनुसार या भांड्यांचा उपयोग होईल. राजेमहाराजे, त्यांचे सरदार, अमीर-उमराव यांचे जनानखाने मोठे, त्यांचा कुटुंब कबिला मोठा, साहजिकच भाऊबंदकी , हेवेदावे यामुळे एकमेकांचा काटा काढण्याचे प्रयत्न केले जात. शिवाय दरबारातील सुंदोपसुंदी, शत्रूकडून फंदफितुरी यांनी इतिहासाची पाने रंगली आहेत, तेव्हा स्वसंरक्षणासाठी सर्व बाबतीत काळजी घेणे अत्यावश्यकच ठरले. राजघराण्यात विषप्रयोग कोणाकडूनही, केव्हाही होण्याचा संभव असतो, तेव्हा आपल्या जेवणाच्या पदार्थात मग ती न्याहारी असो वा शाही मेजवानी असो. त्यातील खाद्यपदार्थांची परीक्षा घेण्याची फार प्राचीन पद्धत आहे. मोगल दरबारात असे प्रकार अधिक होण्याचा संभव होता. त्यासाठी विशेष प्रकारच्या दगडाची भांडी मुद्दाम तयार करण्यात येत असत. अरबस्तानातील एका विशिष्ठ दगडाची हि भांडी बनविली जात, असे म्हणतात. जहांगीर, अकबर, शाहजहान यांच्या काळातील अशाप्रकारची भांडी दिल्ली , आग्रा, हैद्राबाद व परदेशातील काही ठिकाणी पाहिल्याची नोंद मिळते.
असे म्हणतात की कोणताही विषमिश्रित पदार्थ शिजविलेला व कच्चा या भांड्यात टाकला व काही वेळ ठेवला , तर या भांड्याचा रंग गर्द हिरवा होतो व विषविरहित असल्यास त्याचा रंग बदलत नाही. हि दगडी भांडी पातळ, सुबक, चकचकित, प्रमाणबद्ध असून रंग हिरवा व पिवळा(पोपटी) असतो.
मालोजीराजे भोसल्यांचे धाकटे बंधू विठोजी यांची आठ मुले भीमथडीला आपल्या जहांगिऱ्या आजही उपभोगतात्त. पैकी भिकाजीराजे भोसले हे एक. ते मोठे संशोधक होते. त्यांनी आपल्याकडील शहाजीराजांपासूनची सर्व कागदपत्रे, वस्तू व हत्यारे संस्थेस दिली. त्यात हस्तिदंताच्या पट्टीवरील जयसिंह राठोदांच्या दरबारात संभाजीचे रंगीत चित्र व विषपरिक्षा घेणारी भांडी हि वैशिष्ट्यपूर्ण नव्हे, तर महत्वाची व दुर्मिळ मानली जातात. या घराण्यातील परसोजी व सयाजी हे जयसिंहाच्या बाजूने शिवरायांच्या विरुद्ध पुरंदर तहापूर्वी झुंजत होते. त्या कामगिरीबद्द्ल औरंगजेबाने त्यांना इनाम दिले होते. त्यांच्या सनदाही उपलब्ध आहेत. सायजीराजे मोगल दरबारातील बडी असामी बनली व साहजिकच मोगली रीतिरिवाजाबरोबर या व अशाप्रकारच्या वस्तू त्यांच्याकडे आल्या असाव्यात आणि केवळ भिकाजीराजे भोसले यांच्या जागरुकतेमुळे हि भांडी संस्थेस उपलब्ध झाली. काही वर्षांपूर्वी त्यावेळचे गव्हर्नर अली यावर जंग यांनी जेव्हा संस्थेस भेट दिली, तेव्हा ही भांडी पाहून त्यांना हैद्राबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालयातील भांड्यांची आठवण झाली. तेव्हा त्यांनी सुचविले होते की , या भांड्यात विशाबद्दल अशी प्रतिक्रिया का निर्माण होते? त्यात ते कोणते घटक आहेत? त्याचा शास्त्रीय , आधुनिक तंत्र वापरून शोध घेण्याची गरज आहे . पण नेमका तो कुठे घ्यावा, यासंबंधी अजून माहिती नाही. तरीही भांडी पाहताना राजदरबारातील हेवेदावे व त्यावरचा उपाय म्हणून वापरलेली हि भांडी आपले कुतुहल जागे करतात, हे खरे आहे.

लेखक - सुरेश जोशी ( अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय)
संकलन - प्रा. र. भ. वनारसेवरील लेख, सौ. प्रियांका प्रशांत कुंटे. यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.
No comments:
Post a Comment