Saturday, January 14, 2017

सेफ्टी पीनचा शोध

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील सतरावा लेख :

सेफ्टी पिन हि क्षुल्लक वाटत असली तरी अत्यावश्यक आहे. १० एप्रिल १८४९ ला न्यूयॉर्क मध्ये वॉल्टर हंट नावाचा गृहस्थ आपल्या हातातील तारेचा तुकडा वेडावाकडा करीत आपल्या मित्राकडून उसने घेतलेले १५ डॉलर परत कसे करायचे , याच्या विवंचनेत होता आणि याच वेळी त्याला सेफ्टी पिन बनविण्याची कल्पना सुचली. त्याने पेटंट घेतले, पण ४०० डॉलरला विकून मित्राचे पैसे परत केले. हंटने १८३४ मध्ये शिवणयंत्राचा शोध लावला होता, पण बेरोजगारी वाढू नये म्हणून पेटंट घेतले नाही.

अर्थात पुरातनकाळीही लोक पिना वापरत होते, पण त्या प्राण्यांच्या बारीक हाडांपासून बनविलेल्या असायच्या. ग्रीक लोक आपल्या अंगरख्यांना प्राण्यांचे आकार असलेल्या सेफ्टी पिना लावायचे. नवरा बायकोला खर्चासाठी रोज थोडे पैसे द्यायचा, त्याला ‘पिन मनी’ असे म्हटले जायचे. अकराव्या शतकात इंग्लंडमध्ये सेफ्टी पिनांचे एवढे दुर्भिक्ष होते, कि दर वर्षी फक्त १ आणि २ जानेवारीला पिना विकल्या जायच्या. १९ व्या शतकापासून मात्र पिनांचे यांत्रिक पद्धतीने उत्पादन सुरू झाले.  त्या इतक्या स्वस्त झाल्या , कि कुणालाही परवडाव्यात.


लेखक - ईशान कवडीकर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ. प्रियांका प्रशांत कुंटे ांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


No comments:

Post a Comment