मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील चोविसावा लेख :
सर्व सामर्थ्यानिशी देशकार्याला वाहून घेतलेल्या सेवकांची संस्था बांधणे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १९०५ मध्ये भारत सेवक समाज(सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी) या संस्थेची स्थापना केली. समाजाच्या जीवनात अंतर्बाह्य बदल घडविल्याशिवाय तो स्वातंत्र्यला पात्र होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.
स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी असणाऱ्या काँग्रेसच्या १९०७ मधील अधिवेशनातील ही गोष्ट. सुरत येथे डिसेंबर मध्ये हे अधिवेशन भरले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून संघटनेत मतभेद होते. असे असतानाही डाँ.रासबिहारी घोष यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावर लोकमान्य टिळकांनी आक्षेप घेतला.अध्यक्षांनी टिळकांना बोलण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे अधिवेशनात गोंधळाचे वातावरण तयार झाले.एकदम लाठ्या काठ्यांनी हाणामारी सुरू झाली. व्यासपीठावरही लोक धावले. लोकमान्य टिळकांच्यावर ही एक जण धावून आला.हे पाहून नामदार गोपाळ कृष्ण गोखले मध्ये पडले आणि त्या व्यक्तीला त्यांनी रोखले.राजकारण म्हणजे दुसऱ्याचा बळी देऊन वरच्या स्थानावर पोचवण्याची धडपड सुरू असणाऱ्यांचे क्षेत्र अश्या क्षेत्रात स्वतः कधीही कटुतेला खोटारडेपणाला आणि कट कारस्थानांना बळी न पडता अत्यंत सभ्यतेने अप्रिय गोष्टी देखील अत्यंत सुंदरतेने सादर करण्याचे अप्रतिम कौशल्य नामदार गोखले यांच्याकडे होते. त्यामुळेच अत्यंत बुद्धिमान आणि समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले.त्यामुळेच महात्मा गांधीजीनी त्यांना आजन्म गुरुस्थानी मानले.
त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोथळूक या गावी ९ मे १८६६ रोजी झाला.त्यांचे वडील कृष्णराव गोखले कागलमध्ये (जि. कोल्हापूर) फौजदार होते.त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गोपाळचे शिक्षण कागलमध्ये झाले.नंतर मोठा भाऊ गोविंद बरोबर ते शिकण्यासाठी कोल्हापुरात आले.ते केवळ तेरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.वडिलांचा स्वभाव बचतीचा नसल्यामुळे कुटुंबाच्या दृष्टिने हालाखीचा काळ सुरु झाला. त्यांच्या काकांनी गोविंदाला त्या काळी पंधरा रुपये पगारावर कारकून म्हणून कागलमध्ये नौकरीला लावले आणि त्याच्यावर गोपाळच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवली. गोपाळाची आई आणि बहिणीला घेऊन ते कोकणातील ताह्मणमाळ या त्यांच्या गावी गेले. पंधरा रुपयातील आठ रुपये गोविंद कोल्हापूर शिकणाऱ्या गोपळासाठी पाठवत असे.त्या काळी कोल्हापुरात महिन्याच्या जेवणाचे खानावळीचे दर साडेचार आणि चार रुपये होते.साहजिकच गोपाळने चार रुपयांचे जेवण स्वीकारले होते. चार रुपयेवाल्यांना स्वाभावीकपणे जेवणात दूध, दही न मिळता पाणी घातलेले ताक मिळत असे.पण भावाचे कष्ट आणि गरज भागावी आणि गरिबी लोकांना दिसू नये म्हणून स्वाभिमानी गोपाळने हे सर्व स्विकारले होते.पण कितीही केले तरी ते वय मोह होण्याचे होते.मित्रमंडळी समवेत जेवत असताना गोपाळने सर्वांच्या बरोबर दही मागून घेतले.त्यावर खाणावळीवाला खेकसला,"चार रुपडे देणार आणि दही मागून घेणार!" हा अपमान गोपाळला सहन झाला नाही तो तेवढ्याच आवाजात गरजला " मी आज पासून साडेचारच्या दराचंच जेवणार आहे" खाणावळवाल्याचे फावलेच होते.पण गोपाळला महिन्याला वरच्या पैशाची बचत करणे आवश्यक होते. त्यासाठी मग सुटीच्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जेवणाचा खर्च चार रुपयाच्या आत राहील याची काळजी घेऊ लागला.मानीपना आणि परिस्थितीनुसार वागणे याचे धडे गोपाळाला लहानपणापासून मिळाले. गरीबीमुळे व्यवहाराची जाणीव लहान वयातच झाल्याने अर्थशास्त्राचे बीजारोपण त्यांच्या मेंदूत तेंव्हापासूनच झाले. मॅट्रिक झाल्या नंतर प्रथम कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातुन आणि नंतर मुंबईतील एलिफस्टन महाविद्यालयातून ते गणित विषय घेऊन बी.ए. झाले.त्या काळी पदवीधर म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी हात जोडून उभी असे.स्वाभाविकपणे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कुटुंबाची इच्छा आता त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी स्विकारावी अशीच होती.कारण अत्यन्त प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत भावाने त्यांना शिकवले होते, पण ते टिळक-आगरकर यांनी सूरु केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दरमहा पस्तीस रुपये पगाराच्या नोकरीवर रुजू झाले.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणित, इंग्रजी, अर्थशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकवू लागले. वयाने लहान पण बुद्धीने तरतरीत असे मिसरूड फुटू लागलेले गोपाळराव अल्पावधीतच विद्यार्थामध्ये लोकप्रिय झाले.टिळकांच्या सांगण्यावरून ते केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करू लागले.अशा बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामात सहभाग असावा म्हणून त्यांना विनंती करण्यात आली. त्या वेळी कौटुंबिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवा,असे दोन पर्याय त्यांच्यासमोर उभे राहिले.अखेरीस १८८६मध्ये त्यांनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. त्या वेळी ते म्हणाले होते,"माझ्या घरच्या लोकांनी फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या.माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी गडगंज संपत्ती मिळावीन त्यांना सुखात ठेवीन.जेंव्हा त्यांचा आशावर पाणी शिपंडून मी माझे जीवन देशसेवेला अर्पण केले, त्या वेळी माझे बंधू तर इतके बैचेन झाली,की काही दिवस त्यांनी माझ्याशी बोलणे देखील बंद केले. पण लवकरच माझे जीवन कार्य म्हणजे काय आहे , हे त्यांच्या लक्षात आले,ते माझ्यावर पहिल्यासारखेच प्रेम करू लागले."
१८९० मध्ये ते सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून काम करू लागले. या संस्थेच्या त्रैमासिकाच्या संपादनाचे काम त्यांनी केले.त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उमेदवारीचा हा काळ होता.पुढे सार्वजनिक सभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आपल्या बाजूचे नवे सभासद करून घेण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. त्या वेळी झालेल्या निवडणुकीत गोखले सेक्रेटरी म्हणून निवडून आले.पण व्यवस्थापन मंडळात अन्य नवे लोक निवडून आले.त्या वेळी गोखले नी केसरीला लिहलेल्या पत्रात म्हटले की, नवीन सभासद करण्याच्या चढाओढीत आम्ही टिळकाशी कधीही बरोबरी करणार नाही.आमची राजकीय मते सारखीच आहेत.मग पक्षभेदापासून आजवर अलिप्त असलेल्या सार्वजनिक सभेत आजही दुही कशाला?" परंतु साडेसात वर्ष ज्या संस्थेत जीव ओतून काम केले ती सार्वजनिक सभा गोखले यांना सोडावी लागली.कटुतेला, खोटारडेपणाला आणि कारस्थानांना बळी न पडता राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरता येते,हे त्यांनी दाखवून दिले.१८९८ मध्ये ते पुणे नगरपालिकेचे सरकार नियुक्त सभासद झाले.१९०२ मध्ये नगराध्यक्ष झाले.१८९९ मध्येच मुंबई विधिमंडळात आणि १९०९ मध्ये वरिष्ठ कायदेमंडळात निवडून आले.त्या काळात कोलकत्ता हे राजधानीचे शहर होते.तिथे ब्रिटिशांची इम्प्रिरियल लेजिस्लेटिव्ह कौस्निलची अधिवेशने होत.सगळे कामकाज इंग्रजीतून चालत असे.अर्थात प्रवाहीपणे इंग्रजी बोलणाऱ्या गोखले यांची भाषणे त्या वेळच्या लॉर्ड कर्झन भारावलेल्या अवस्थेत ऐकत राहत असे.त्या काळी गोखले वारंवार कोलकत्त्याला जात.१९०१ मध्ये तिथे त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली.दोघेजण महिनाभर एकत्र होते.गोखले पूर्ण वेळ काँग्रेसचे सचिव म्हणून काम विनावेतन करत होते.काँग्रेस संघटनेतील मतभेद आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.त्यांचे कार्य व्यपक होत होते.सर्व सामर्थ्यानिशी देशकार्याला वाहून घेतलेल्या सेवकांची संस्था बांधणे हे त्यांचे स्वप्न होते.त्यासाठी १९०५ मध्ये भारत सेवक समाज(सर्व्हट्स इंडिया सोसायटी)या संस्थेची स्थापना केली.समाजाच्या जीवनात अंर्तबाह्य बदल केल्याशिवाय तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही,असे त्यांचे म्हणणे होते.त्यासाठी विधायक कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण करावे लागतील, असे त्यांचे मत आहे.
एखादे धार्मिक कृत्य करायचे झाल्यास ज्या चैतन्याने माणसे त्या कामासाठी पुढे सरसावतात त्याच चैतन्याने देशसेवेच्या कामासाठी तरुणांनी पुढे सरसावले पाहिजे , ही एक आवश्यक गोष्ट आहे .सर्वांची अंतःकरणे देशप्रेमाने इतकी काठोकाठ भरली पाहिजेत, की त्याच्यापुढे सर्व गोष्टी अगदी तुच्छ तुच्छ वाटल्या पाहिजेत,असे ते नेहमी सांगत .देशबांधणीचे काम वेगाने व्हावे यास्थिया कार्यात समर्पित वृत्तीने सहभागी होणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीची नितांत गरज असते, हे ओळखून त्यांनी अश्या पद्धतीचे शक्ती तयार करण्याचे प्रयत्न केले.त्यातूनच भारत सेवक समाजाने आदिवासासाठी कार्य केले.आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे प्रश्न यशस्वीपणे हाताळले. पूर ,दुष्काळ ,रोगराई ,भूकंप अश्या संकटांच्या प्रसंगी काम केले. स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.गोरगरिबांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सहकारी पतपेढ्या सुरु केल्या.भारत सेवक समाज संस्थेतून श्रीनिवास शास्त्री, ठक्करबाप्पा, नारायण मल्हार जोशी, गोपाळ कृष्ण देवधर, आर आर बखले, श्रीधर गणेश वझे, नरेश अप्पाजी द्रविड, वामनराव पटवर्धन असे अनेक भारत सेवक तयार झाले.प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे काम उभे केले.त्यांच्या भारत सेवेचे स्मरण होऊन कोणत्याही देशभक्ताची मान आदराने लवते. गोखले यांच्या भारत सेवक समाज संस्थेत सहभागी होऊन कार्य करावे , असे महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरु,राजेंद्र प्रसाद मोठ्या नेत्यांना वाटत होते.यातूनच संस्थेच्या आणि गोखले यांच्या कार्याचे मोठेपण स्पष्ट होते.आम्ही प्रथम भारतीय अहोतानी नंतर हिंदू, मुस्लिम,ख्रिस्ती , पारशी (असे कुणीतरी ) आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे,असे ते नेहमी सांगत. हे सर्व करत असताना भारताचे अनेक प्रश्न त्यांनी व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मोठ्या तडफेने मांडले. गांधीजींबरोबर ते आफ्रिकेत गेले.तेथे फिरले.प्रसंगी पायी फिरले.चटईवर झोपले.या काळात गांधीजी त्यांचा अधिक जवळ आले.पुढे गोखले यांच्या आग्रहामुळे गांधीजी कायमचे भारतात आले आणि स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. गोखले आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते,आणि त्या काळात पाश्चात्यांच्या योग्य गोष्टीचा आनंदाने स्वीकार करण्याची त्यांची भूमिका होती.अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे निधन वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी म्हणजे १९फेब्रुवारी १९१५ रोजी झाला.
लेखक:- सुहास यादव.

No comments:
Post a Comment