मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील पंचविसावा लेख :
लोकमान्य टिळकांच्या राजकीय कर्तृत्वाचा एक पैलू बराचसा अपरिचित राहिला आहे, तो म्हणजे लोकमान्य टिळकांनी इंग्लंडमधील लेबरपार्टीशी १९०७पासून जोडलेले स्नेहाचे संबंध आणि परदेशात विशेषतः इंग्लंडमध्ये भारताच्या राजकीय आकांक्षेचा स्वराज्याचा केलेला प्रचार. लोकमान्य टिळकांच्या १५१ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या राजकीय दूरदृष्टीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, या लोकमान्य टिळकांच्या चैतन्यदायी शब्दांनी असंख्य भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्वाला उफाळली. लोकांची राजकीय आकांक्षा जागृत करण्यासाठी टिळकांनी त्यांची लेखणी आणि वाणी यांचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखातून ब्रिटिश सरकारच्या
जुलमी धोरणावर कठोर टीका केली आणि लोकांना त्यांच्या देशाबद्दलच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. १८९७ मध्ये टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात येऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.१९०८ मध्ये भारतातील पहिल्या बॉम्बस्फोटानंतर टिळकांनी जे अग्रलेख लिहिले त्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात आला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा होऊन ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात पाठविण्यात आले. टिळकांनी या शिक्षा निर्भयतेने भोगल्या. त्यामुळेच त्यांना लोकमान्यत्व प्राप्त झाले आणि त्यांच्या स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे या शब्दांना मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले. राजकीय नेत्याचे प्रमुख कार्य वर्तमानकाळातील समस्यांची सोडवणूक करणे , हे असते. लोकमान्य टिळक त्यांच्या काळातील सर्व समस्यांना सामोरे गेले आणि त्या सुटाव्यात, यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्षही केला. हे करतानाच टिळकांनी भविष्यकाळाचा वेध घेतला.
त्यावेळी इंग्लंडमधील राजकारणात कॉन्झर्वेटीव्ह पार्टी आणि लिबरल पार्टी हे दोन प्रमुख पक्ष होते. त्याचबरोबर लेबर पार्टी नव्याने उदयास येत होती. कॉन्झर्वेटीव्ह पक्षाचे नेते कट्टर साम्राज्यवादी होते.भारताला हळूहळू राजकीय हक्क दिले पाहिजेत, याची जाणीव होती. लेबरपार्टी नव्यानेच स्थापन झाली होती. असे असूनही टिळकांनी, लेबर पार्टीशी आपण संबंध जोडणे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे, हे अचूक ओळखले होते. हि त्यांची राजकीय दूरदृष्टी होती.
ऑक्टोबर १९०७ मध्ये जेम्स केर हार्डी हे लेबर पक्षाचे एक पुढारी भारतात दौऱ्यासाठी आले होते. टिळकांनी त्यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आणि निमंत्रण स्वीकारून केर हार्डी पुण्यात आल्यानंतर त्यांनी केसरी कार्यालयास ; तसेच सार्वजनिक संस्था आणि अन्य संस्थांना भेटी दिल्या. सार्वजनिक सभेतर्फे केर हार्डी यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांचे स्वागत करताना टिळकांनी त्यांच्या समोर भारतातील तत्कालीन स्थितीचे चित्र रेखाटून भारताची राजकीय आकांक्षाही व्यक्त केली. केर हार्डी यांनी ‘ मी इंग्लंडला परत गेल्यावर तेथील लोकांना आणि विशेषतः लेबर पक्षातील माझ्या सहकाऱ्याना भारताचा प्रश्न समजावून सांगेन’ असे अभिवाचन दिले. भारताची राजकीय चळवळ प्रभावी करतानाच इंग्लंडमधील लोकांना आपला प्रश्न समजून सांगितला पाहिजे, हे टिळकांनी बरोबर जाणले होते. लेबर पार्टी हा नव्याने उदयाला आलेला पुरोगामी पक्ष आहे, हे जाणल्यामुळेच त्यांनी केट हार्डी यांचे स्वागत केले. आणि त्यांच्यामार्फत लेबर पार्टीशी संबंध जोडण्यास सुरवात केली.
लोकमान्य टिळक काँग्रेसमधील त्यावेळचे एक प्रमुख नेते विट्ठलभाई पटेल याना म्हणाले, ‘प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधी अन्य देशांमध्ये त्यांच्या देशाची बाजू मांडतात. आजजरी हिंदुस्थान परतंत्र असला तरी आपले राजकीय उद्दिष्ट आणि आपण राज्य कसे करू शकू, हे जगाला समजलेच पाहिजे.’ विट्ठलभाई पटेल म्हणाले, “पण आपला लढा तर आपल्यालाच काढावा लागेल ना?” टिळक म्हणाले “हे तर खरेच आहे, भारतीय जनतेला भारताच्या भूमीवरच आंदोलन करून स्वराज्य मिळवावे लागेल; पण त्याच बरोबर जगात सगळीकडे आपले मित्र असले पाहिजेत आणि विशेषतः इंग्लंडमधील लोकांना आपली भूमिका समजली पाहिजे, असे मला वाटते.”
इंग्लंडमध्ये भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी टिळकांना श्यामजी कृष्ण वर्मा हे एक विश्वासू सहकारी मिळाले. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पूर्वी सौराष्ट्रातील काही संस्थांनांमध्ये दिवाणाचे काम केले होते, त्यामुळे त्यांना भारताच्या परिस्थितीचे उत्तम ज्ञान होते. पुढे ते इंग्लंडला गेले आणि बॅरीस्टर होऊन त्यांनी त्या व्यवसायात उत्तम यश मिळविले. टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडन मध्ये ‘इंडियन सोशिओलॉजिस्ट’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. ‘इंडियन सोशिओलॉजिस्ट’ मधून भारताच्या दारिद्र्याचे विदारक चित्र आकडेवारीनिशी वर्मा मांडत आणि त्याचबरोबर भारताला स्वराज्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखातून आग्रहाने प्रतिपादन करीत. इंग्लंडमधील मुद्रण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन वर्मा ब्रिटिश सम्राज्यवाद्यांवर कठोर टीका करीत असत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची एक अभिनव योजना वर्मा यांनी सुरु केली, आणि टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाचे असे ठरले. सावरकराना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्म यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची इंडिया हाऊस मध्ये राहण्याची सोयही केली. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशातही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहकाऱ्यांमध्ये मॅडम काम या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्या प्रभावी वक्त्याही होत्या.१९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टूट गार्ट येथे जागतिक समाजवादी परिषद भरली होती. मॅडम कामा या त्या परिषदेस हजर राहिल्या.त्यांनी त्यांनी स्वतः तर भारताचा ध्वज फडकविला आणि त्या म्हणाल्या, “हा ध्वज भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यप्रेमी समाजवादी मित्रांनो, या ध्वजाला साथ द्या आणि जगातील एक पंचमांश जनतेला पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी भारताला साह्य करा.” मॅडम काम यांच्या कर्तृत्वाची हकीकत टिळकांना समजली, त्या वेळी त्यांना फार समाधान वाटले. वर्मा यांनी सूचना आणि साह्य केल्यामुळे मॅडम काम यांनी अमेरिकेचा दौरा केला आणि व्याख्यानांतून तेथील लोकांसमोर भारताची बाजू मांडली.टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्वाचा होता.
१९१९ मध्ये इंग्लंडमधील जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे निवेदन सादर करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे जे शिष्टमंडळ गेले होते त्याचे नेतृत्व विट्ठलभाई पटेल हे करीत होते. लोकमान्य टिळक हे होमरूल लीगच्या शिष्ठमंफळातर्फे पार्लमेंटरी कमिटिस निवेदन देणार होते. या दोनही शिष्टमंडळानि परस्परांशी सहकार्य करून भारताची राजकीय हक्कांची मागणी एकमुखाने इंग्लंडच्या पार्लमेंटरी कमिटीसमोर मांडली.
याच सुमारास इंग्लंडमध्ये पार्लमेंटच्या निवडणूका होणार होत्या. टिळकांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. नोव्हेंबर १९१८ मध्ये टिळकांनी लेबर पार्टीच्या निवडणूक फंडास मदत म्हणून २०००पौंडांचा चेक भेट म्हणून दिला. टिळकांनी लेबर पार्टीच्या हेडर्सन, बेब आदी नेत्यांची गाठ घेतली आणि त्या नेत्यांनी भारताच्या स्वराज्याच्या मागणीस पाठिंबा देण्याचे टिळकांना आश्वासन दिले, नॉटिंगहॅम येथे भरलेल्या लेबर पार्टीच्या परिषदेमध्ये भारताच्या राजकीय हक्कांच्या मागणीस पाठिंबा देणारा ठरावही करण्यात आला. टिळकांच्या मार्गदर्शनाखाली बॅ. बॅपटिस्टा यांनी ‘सेल्फ डिटर्मिनेशन’ असे शीर्षक असलेली अत्यंत उत्तम पुस्तिका तयार केली आणि लोकमान्यांनी या पुस्तिकेच्या शेकडो प्रति इंग्लंडमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. इंग्लडमधील निवडणुकीच्या निमित्ताने टिळकांनी काही छोटी पत्रके छापून भारताची होमरूल ची मागणी मांडली आणि त्या पत्रकांच्या प्रती मतदारांमध्ये वाटल्या.
महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको याना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी , अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही.टिळकांनी त्यांच्या निवेदनात पुढीलप्रमाणे लिहिले होते, ‘ जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील.’ होमरूल डेप्युटेशन चे एक सदस्य बॅ. वेलकर यांनी पुढील आठवण सांगितली होती.टिळक वेलकाराना म्हणाले,’लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा मी प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, कि आपल्याला स्वराज्य मिळण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साहाय्य होईल.’ पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले. १९३८ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु होण्यापूर्वी पंडित नेहरू इंग्लंडमध्ये गेले होते.तेव्हा लेबर पार्टीचे काही नेते आणि पंडित नेहरू व व्ही. के.कृष्णमेनन यांच्यात बैठक २४ जूनला स्टफर्ड क्रिप्स यांच्या निवासस्थानी झाली. त्या बैठकीस लेबर व पार्टीचे मान्यवर नेते स्टॅफर्ड क्रिप्स, रिचर्ड क्रॉसमन, ataly बेव्हन आणि बारनेस हे हजर होते. प्रा.हेरॉल्ड लास्की हे ही त्यांच्या समवेत होते. लेबर पार्टीच्या नेत्यांनी २४ जून १९३६ च्या या बैठकीत नेहरूंना असे आश्वासन दिले, कि दुसऱ्या महायुद्धानंतर लेबर पार्टी जेव्हा इंग्लंडमध्ये सत्तेवर येईल, तेव्हा भारताला स्वराज्य दिले जाईल, प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धानंतर लेबर पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यावर त्या वेळचे पंतप्रधान ataly यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अशी घोषणा केली, कि भारतास स्वातंत्र्य देताना कशारीतीने सत्तांतर करावयाचे, हे निश्चित करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात पाठविले जाईल.’याशिष्टमंडळात क्रिप्स हे सदस्य होते. लोकमान्य टिळकांनी १९०७ मध्ये केर हार्डी यांचे स्वागत केले. या प्रक्रियेची परिणती लेबर पार्टीचे सरकार इंग्लंडमध्ये असताना भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.
लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन विशाल व व्यापक होता. त्यांनी रवींद्रनाथ टागोर याना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रुपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ‘मी राजकीय कार्यकर्ता नाही, मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.’ टिळकांनी त्यांना कळविले ,’तुम्ही राजकीय प्रचार करावा , अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्वाची वाटते.

No comments:
Post a Comment