सेडॉन पार्क स्टेडीयम हे मैदान न्यूझीलंड मधील हॅमिल्टन या शहरात आहे. हॅमिल्टन हे न्यूझीलंड मधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच तेथील सुरेख वातावरणामुळे व्हिलेज ग्रीन या नावाने हे शहर प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्यामुळे पिकनिक स्पॉट म्हणून अनेक निसर्ग प्रेमी येथे सहलीला येतात. येथील सेडॉन क्रिकेट स्टेडीयम हे न्यूझीलंडमधील दोन नंबरचे सर्व सुखसोयींनी समृद्ध असे मोठे मैदान आहे. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान रिचर्ड जॉन सेडॉन यांचे नाव या स्टेडीयमला देण्यात आले आहे. हे स्टेडीयम ट्रस्ट बँक पार्क म्हणूनही ओळखले जाते. तसेच वेस्टपॅक ट्रस्ट पार्क आणि वेस्ट पॅक पार्क अशा प्रकारची त्यातील काही भागांना नावे देण्यात आली होती. परंतु २००६ साली वेस्टपॅक ट्रस्ट बँक न्यूझीलंड यांनी ठरवले कि प्रत्येक खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी मैदानाचे वेगवेगळे भाग आणि त्यासाठी वेगवेगळे प्रायोजक असण्यापेक्षा हि सर्व नावे मागे घेवून फक्त सेडॉन पार्क याच नावाने हे स्टेडीयम ओळखले जाईल.
२००६-२००७ पासून या स्टेडीयम चे सेडॉन पार्क हेच नाव निश्चित करण्यात आले. सेडॉन पार्क या मैदानाचा आकार हा संपूर्णतः गोल आहे. क्रिकेट मैदानाच्याच दृष्टीने मग या मैदानावर क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेडॉन पार्क हे मैदान अतिशय उत्तम तऱ्हेच्या हिरवळीने सजवलेले मैदान आहे. या हिरवळीवर मध्यभागी नऊ धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सरावासाठी किंवा सामन्यांसाठी आलटून पालटून उत्कृष्टपणे तयार केलेल्या धावपट्टीवर खेळता यावे. या सर्व धावपट्ट्या या दक्षिणोत्तर आहेत. फलंदाजी साठी उत्कृष्ट अशा या धावपट्ट्या आहेत या मैदानाच्या बाहेरच्या बाजूने उंच आणि भव्य असे कुंपण घातलेले आहे. समोरच्या बाजूला धावफलक असून त्यावर खेळणाऱ्या संघांच्या खेळाडूंची नावे उद्धृत केलेली असतात. तसेच धावांचा बदलता निर्देशही त्यावर असतो. हे मैदान क्रिकेट प्रमाणे इतर अनेक खेळ आणि कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. क्रिकेटचा मोसम नसतांना तेथे हॉकी, रग्बी आणि रग्बी लीग यांचे सामने घेतले जातात. याशिवाय अनेक समारंभासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या मैदानाची पाणी निचरा होण्याची पद्धत हि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून ती उत्कृष्टपणे कार्यक्षम असल्यामुळे मैदानावर पाणी साठून राहात नाही. येथे आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळले जातात. नऊ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने येथे खेळविले गेले आहेत.
टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:
Post a Comment